crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शेतीच्या वादावरून एकावर विळ्याने हल्ला; चौघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शेतीच्या बांधावरून कोर्टात दावा दाखल असताना जागेत वखरणी का केली, या कारणावरून वाद होऊन एकाने विळ्याने वार केल्याने दोन जण जखमी झाले. ही घटना पुनखेडा (ता. रावेर) येथे घडली.

याबाबत रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या परस्पर तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (One was attacked with sickle over farm dispute jalgaon crime news)

पुनखेडा येथील सुभाष रामभाऊ पाटील व श्रीराम दलपत धनगर यांच्यात शेतजमिनीच्या मोजणीबाबत कोर्टात दावा दाखल आहे. श्रीराम धनगर हे शुक्रवारी (ता. २९) या जागेत वखरणी करीत असल्याने सुभाष पाटील यांनी याबाबत धनगर यांना जाब विचारला. याचा राग आल्याने धनगर यांचा मुलगा अमोलने हातातील विळा पाटील यांच्या डोक्यावर मारून जखमी केले.

मनोज पाटील यास श्रीराम धनगरने दगड पाठीवर मारून दुखापत केली, असे मनोज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

याच घटनेत वखरणी करणाऱ्या श्रीराम धनगर यांना सुभाष पाटील यांनी दगड मारून दुखापत केली. अमोल धनगर यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत दोघे जखमी झाले आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून पुढील उपचारार्थ जळगावच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदशनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update: भूमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंवर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Pune Fire News: पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, परिसरात धुराचे मोठे लोट

SCROLL FOR NEXT