Collector Abhijit Raut latest marathi news esakal
जळगाव

जळगाव : गणेशोत्सवात विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना - जिल्हाधिकारी राऊत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरासह जिल्ह्यात यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असल्याने यंदाचा गणेशोत्सव निर्बंधाविना साजरा होणार आहे. गणेश मंडळांनी गणेशोत्सव उत्साहात, जोशात साजरा करा, मात्र शांततेत करा, गणेश मंडळांना त्यांना लागणाऱ्या विविध परवानग्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक खिडकी’ असेल, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी (ता. २) येथे सार्वजनिक गणेश उत्सवाच्या बैठकीत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. (Latest Marathi News)

जिल्हा नियोजन भवनात मंगळवारी गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलिस अधिकारी, सर्व पालिकांचे मुख्याधिकारी यांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड, आमदार सुरेश भोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यावेळी उपस्थित होते.


स्वतंत्र नोडल अधिकारी

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, महानगर पालिका, नगरपंचायत आणि नगरपरिषद यांनी उत्सव काळात गणेश मंडळास येणाऱ्या अडचणी, विविध प्रकारच्या परवानगी तसेच उत्सव काळात प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी (समन्वय) यांची नेमणूक करावयाची आहे. महानगर ‘पालिका, नगरपंचायत आणि नगरपरिषद यांनी उत्सवासाठी परवानगी देण्यासाठी ‘सिंगल विंडो सिस्टीम (एक खिडकी योजना) पध्दतीचा अवलंब करावयाचा आहे. परवानग्या ऑनलाईन पद्धतीने देण्यात याव्यात त्याबाबत संबंधितांना योग्य ती माहिती उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.


मार्गावरील खड्डे बुजवा

उत्सव परिसरातील मिरवणूक मार्गातील रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा, उत्सव काळात व पुढील काळात रस्ते सुव्यवस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी. रस्त्यावरील इतर अडथळे दूर करावे. उत्सव काळात सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य विषयक सुविधा, स्वच्छता राखण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. महापालिका, नगरपंचायत, नगरपरिषद यांनी उत्सवासाठी मंडपाचे भाडे किंवा शुल्क आकारणी करताना अवाजवी आकारणी करु नये. मंडपांची उभारणी करताना न्यायालयाचे निर्देशानुसार वाहतुकीला अडथळा येणार नाही, अशा पध्दतीने मंडळांनी काळजी घ्यावी. मंडपाची तपासणीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी सर्वविभाग व गणेश मंडळाशी समन्वय ठेवून कामकाज करावे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर कमी होण्याच्या दृष्टीकोनातून जनजागृती करावी.



वीजपुरवठा अखंडित ठेवा

उत्सव काळात सार्वजनिक मंडळ परिसर व मिरवणूक रस्त्यावर विद्युत व्यवस्था करण्यात यावी. वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची महावितरणने काळजी घ्यावी, अशा ही सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या. यासह, विसर्जन प्रसंगी विसर्जन घाट, कृत्रिम विसर्जन तलाव या ठिकाणी योग्य प्रकारे विद्युत व्यवस्था करावी. इतर
आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.



निर्माल्य संकलन करा

गणेश विसर्जनाच्या दिवशी विसर्जन घाट तसेच कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र स्वच्छ वाहन असावे, त्याचप्रमाणे मुर्ती संकलनासाठी वापरण्यात येणारी वाहने स्वच्छ व सुव्यवस्थित असतील याची दक्षता घ्यावी. शहरात आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त कृत्रिम विसर्जन तलाव उपलब्ध करून द्यावेत. विसर्जनानंतर कृत्रिम तलावातील मातीची, मूर्तीची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. विल्हेवाट लावताना जनभावना दुखावल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना राऊत यांनी दिल्या आहेत. पोलिस अधिक्षक डॉ. मुंडे म्हणाले, की उत्सव शांततेत साजरा करा.

कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घ्या. प्रत्येक मंडळांना पोलिस बंदोबस्त देण्यात येईल. विसर्जन मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळा. महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. श्री. नारळे म्हणाले, की शहरात सर्वच ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. ते अगोदर बुजवावेत. मूर्ती आणताना खड्डयांमुळे काही अघटित घडणार नाही, याची काळजी घ्यावी. वीज कंपनीने अखंडित वीजपुरवठा करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

भारतीय संघ 'घरच्या' मैदानावर पाहुणा म्हणून खेळणार! बाहेरचा संघ यजमान म्हणून मिरवणार; नेमकं असं का होणार? जाणून घ्या वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : आज रात्री आम्हाला अटक केली जाऊ शकते; CJP संस्थापक अभिजीत दीपके यांचा दावा

Car Stunt Video: धावत्या कारच्या छतावर बसून जीवघेणा स्टंट! Video Viral होताच पोलिसांची कारवाई, तरुणाने कान पकडून मागितली माफी

CM Joseph Vijay Movie : कायदेशीर लढाई आणि सेन्सॉरच्या आक्षेपानंतर अखेर 'जननायकन' रिलीज! थलपती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाची धमाकेदार एन्ट्री, 50 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

SCROLL FOR NEXT