Onion Stocking esakal
जळगाव

गिरणा पट्ट्यात कांदा मातीमोल; विक्रमी उत्पादनाने भाव घसरले

दिपक कच्छाव

मेहुणबारे (जि. जळगाव) : चाळीसगाव तालुक्यात कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने बळीराजा हताश झाला आहे. या वर्षीच्या उन्हाळी कांद्याचे (Onion) गिरणा परिसरात विक्रमी उत्पादन (Record Production) झाले. परंतु भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे कांद्याने वांधा केला असून, खर्चही निघत नसल्याने काद्यांबाबत शासनाने ठोस धोरण ठरवावे, अशी मागणी होत आहे. (onion Record production pushed prices down in Chalisgaon Jalgaon News)

चाळीसगाव तालुक्यात मागील वर्षी एक हजार पाचशे हेक्टरवर उन्हाळी काद्यांची लागवड करण्यात आली होती. यावर्षी एक हजार हेक्टरवर वाढली असून एकूण २ हजार पाचशे हेक्टरपर्यंत कांदा लागवड झाल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली. तालुक्याचे एकूण क्षेत्र ९५ हजार हेक्टर आहे. त्यात ऊस, मका, केळी आदी पिके घेतली जातात. तालुक्यात कांद्याची रोपे तयार करण्यापासून ते लागवड करणे, मशागत करणे आदी बाबींवर खूप मोठा खर्च झाला आहे. मागील वर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने उन्हाळी कांदा लागवड देखील वाढली होती.

हमीभावाची मागणी

राज्य शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा, जेणेकरून शेतकऱ्याला नुकसानीचा सामना करावा लागणार नाही. शासनाच्या योजनांची गावपातळीवर शेतकऱ्यांना कुठलीच माहिती दिली जात नाही. त्यामुळे ‘माय जेऊ देई ना, अन् बाप भीक मागू देई ना..’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. कांद्याला एक हजार ते बाराशे रूपयांचा हमीभाव द्यावा, अशी मागणी होत आहे.

खर्चही निघणार नाही

कांदा लागवडीसाठी मशागत, रोपे खरेदी, खते, पाणी, मजुरी, वाहतूक, आडत, हमाली, असा खर्च पाहता शेतकऱ्यांना सतत सहा महिने शेतात राबून काद्यांची काळजी घ्यावी लागते. आज काद्यांला सातशे ते आठशे रुपये भाव मिळेल, ही आशा असते. मात्र बाजारात कांदा विक्री करण्यासाठी नेल्यावर पाहिजे भाव तर सोडा वाहन भाडे देखील निघत नाही. याचबरोबर उत्पादन खर्च देखील निघत नाही. याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. बाजारात जाऊन कांदा विकणे, वाहनभाडे देणे असा सर्व खर्च आजच्या स्थितीत परवडत नसल्याने काद्यांने वांदा केल्याचे चित्र दिसत आहे.

वाढत्या तापमानाचा फटका

गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. अशा वातावरणात कांदा चाळीतील कांदा सडण्याची शक्‍यता असल्याने बहुतांश शेतकरी कांदा चाळीत न ठेवता, बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत. मागील वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच सडला होता. त्यामुळे जो भाव मिळेल, त्या भावात विकून शेतकरी मोकळे होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT