overtaking speeding dumper crushed biker jalgaon accident news esakal
जळगाव

Jalgaon Accident News : ओव्हरटेकच्या नादात डंपरने दुचाकीस्वारास चिरडले; आकाशवाणी चौकातील घटना

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : शहरातील आकाशवाणी चौकात उड्डाणपुलाजवळ ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. स्वप्नील सुरेश जोशी (वय ३५), असे मृताचे नाव आहे. (overtaking speeding dumper crushed biker jalgaon accident news)

देवीदास कॉलनीतील स्वप्नील जोशी आई स्मिता, वडील, पत्नी समिधा, मुलगा वेद (वय ४), मुलगी समीक्षा आणि भाऊ यांच्यासह राहात होते. प्रेमनगरात त्यांचे किराणा दुकान असून, मंगळवारी (ता. ११) दुपारी चारच्या सुमारास स्वप्नील जोशी दुचाकी (एमएच १९, बीएस ४१३) ने इच्छादेवी चौकाकडून आकाशवाणी चौकातून दुकानाच्या दिशेने निघाले होते.

उड्डाणपुलाजवळच मागून सुसाट येणाऱ्या डंपर (एमएच १९, सीवाय ५७८८) चालकाने ओव्हरटेकच्या नादात स्वप्नील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात स्वप्नील यांच्या डोक्याला डंपरचा फटका बसल्याने स्वप्नील जागीच ठार झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

डंपरचालक फरारी

दुपारी चारच्या सुमारास मुख्य चौकात अपघात झाल्याने नागरिक आणि रिक्षाचालकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातात दुचाकीस्वाराला चिरडल्याची खात्री होताच अपघाताला कारणीभूत चालक डंपर सोडून फरारी झाला. आकाशवाणी चौकात पोलिस नाईक हर्शद गवळी आणि चालक दीपक पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळत खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला.

मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती स्वप्नील यास मृत घोषित केले. रामानंदनगर पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मृत तरुण पोलिस अधीक्षक कार्यालयातील निवृत्त कार्यालयीन अधीक्षक सुरेश जोशी यांचा मुलगा आहे. जिल्‍हा रुग्णालयात नातेवाइकांसह परिचितांनी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil: भाजप नेत्याच्या घरी सतेज पाटील! गोकुळ निवडणुकीआधी कोल्हापुरात राजकीय भूकंप, समीकरणे बदलणार?

Donald Trump यांचा मोठा निर्णय! व्हिसा मुलाखती अनिश्चित काळासाठी स्थगित; अमेरिकेच्या प्रवासाची तयारी करणाऱ्या लाखो अर्जदारांना फटका

आजचे राशिभविष्य - 26 ऑगस्ट 2026

विशेष : सागरी क्षेत्रात करिअरच्या संधी

भविष्यवेध : एआय, डेटा सायन्स, मशिन लर्निंग की सीएस आयटी?

SCROLL FOR NEXT