Maize kept in market committee premises.
Maize kept in market committee premises.  esakal
जळगाव

Jalgaon News : पाचोरा बाजार समितीचे आवर झाले पिवळेशार; मका, सोयाबीनची विक्रमी आवक

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून मका, सोयाबीन, सूर्यफूल, ज्वारी, बाजरी या उत्पादनाची आवक मोठ्या प्रमाणात होत असली तरी गेल्या दोन दिवसांपासून मका व सोयाबीनची विक्रमी आवक होत असल्यामुळे संपूर्ण बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला मका पसरविण्यात आल्याने बाजार समितीचे आवार पिवळेशार झाले आहे. बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक, त्यात पुन्हा वाढती आवक व शेतकऱ्यांची गर्दी यामुळे बाजार समिती यात्रेचे स्वरूप आले आहे. ( pachora market committee Records arrival of maize and soybean for last two days jalgaon news)

पाचोरा परिसरात यंदा पावसाची अनियमितता राहिली. कापसाचा पेरा सर्वाधिक असला तरी रोगराईमुळे कापसाचे उत्पादन धोक्यात आले. कापसाखालोखाल मका व सोयाबीनची लागवड करण्यात आली. तालुक्याला लागून असलेल्या मराठवाडा भागात देखील मोठ्या प्रमाणात मका पेरण्यात आल्याने या मक्याची काढणी होताच बाजार समितीत आवक वाढली आहे.

नियमित लिलाव, योग्य भाव, योग्य मोजमाप व लगेच पेमेंट यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजार समितीत मका व सोयाबीन आणत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ट्रॅक्टरमधून मका, सोयाबीन आणले जात असल्याने बाजार समितीच्या आवारातील गर्दी व गोंगाट वाढला आहे.

ट्रॅक्टरची प्रचंड संख्या व आवक पाहता बुधवारी (ता. ५) वाहतुकीला अडथळा होईल, या भीतीने भडगाव रोड भागातील मुख्य प्रवेशद्वार बंद करून पुनगाव रोड भागातील मागच्या प्रवेशद्वारातून ट्रॅक्टर बाजार समिती आवारात सोडण्यात येत आहेत. सकाळपासूनच भडगाव रोड भागातील शासकीय विश्रामगृहापर्यंत ट्रॅक्टरची रांग लागली.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

व्यापाऱ्यांनी सकाळीच लिलाव प्रक्रिया सुरू केली. पावसाचा अंदाज पाहता लिलाव, खरेदी करून लगेचच मक्याची पोती भरून ती सुरक्षित स्थळी ठेवावी लागत असल्याने व्यापाऱ्यांची ही मोठी धावपळ होत आहे.

बाजार समितीत निवडणुकीसंदर्भातील प्रक्रिया, त्यामुळे होणारी गर्दी व वाढती आवक यामुळे बाजार समितीला यात्रेचे स्वरूप आले आहे. शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकून लगेज घरी परतता यावे, यासाठी बाजार समितीचे प्रशासक, सचिव, कर्मचारी यांनी सुयोग्य नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

"गेल्या दोन, तीन दिवसांपासून मका, सोयाबीन, सूर्यफूल, ज्वारी, बाजरी, हरभरा यांची आवक वाढली आहे. व्यापारी व हमाल मापाडी यांना नियमित लिलाव, मोजमाप या संदर्भात सूचित केले असून, शेतकऱ्यांना बाजार समितीत ताटकळत थांबावे लागू नये, यासाठीचे संपूर्ण नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल वेळेवर आणावा. काही तक्रारी असल्यास बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधावा." - बी. बी. बोरुडे, सचिव

पाचोरा बाजार समितीतील भाव

(भाव क्विंटल मध्ये)

मका = १७०० ते २१००.

ओला मका= १६००ते १७७६.

सूर्यफूल = ३७२५ ते ५४११.

सोयाबीन= ४९९० ते ५१७० .

दादर = २९०० ते ३४००.

तूर लाल = ८०९० ते ८२०१.

तूर पांढरी= ७७३० ते ७९००.

हरभरा चापा= ४६०१ ते ४७००.

हरभरा मेक्सिको = ८३०० ते ९५४०.

हरभरा व्ही २= ६६८१ ते ७१९०.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma : MI चा पराभव मात्र टीम इंडियाला दिलासा! शेवट गोड लखनौनेच केला

मुलं हवीत की ‘रील स्टार’?

मानवी अस्तित्वाचा वास्तव शोध!

महिला धोरणांचा प्रवास

अनुभवात्मक शिक्षण हवेच!

SCROLL FOR NEXT