Israel Hama war esakal
जळगाव

Jalgaon News : इस्राईलविरोधी बॅनरबाजी; पाचोरा पोलिस यंत्रणा अलर्ट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील शहराच्या मध्यवर्ती भागातील हुसैनी चौकात व राष्ट्रीय महामार्गावर काही समाजकंटकांनी इस्राईलविरोधात बॅनरबाजी करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला असला तरी पोलिस यंत्रणेने अलर्ट मोडवर येऊन बॅनर काढून बॅनरबाजी करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. (pachora police on alert due to banner against israel jalgaon news )

पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने इस्राईलवर हल्ले करून प्रचंड जीवित व वित्तहानी केली.

या प्रकारानंतर काहींनी इस्राईलला पाठिंबा दिला, तर काहींनी हमास संघटनेचे समर्थन केले. या क्रिया-प्रतिक्रियांचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोचले असून, पाचोरा येथे शुक्रवारी रात्री देशमुख वाडी भागातील हुसैनी चौक परिसरात ‘इस्राईल बॉयकॉट’ लिहिलेले बॅनर लावण्यात आले.

पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन बॅनर काढून शांतता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु शनिवारी सकाळी पुन्हा राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या जारगाव चौफुली ते समर्थ पेट्रोलपंपापर्यंतच्या भागात ‘इस्राईल बॉयकॉट’ असा उल्लेख असलेले बॅनर लावले.

या प्रकारामुळे पोलिस यंत्रणा अलर्ट झाली असून, बॅनरबाजी करून शांतता भंग करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft News: मायक्रोसॉफ्टचा धक्कादायक निर्णय! तब्बल ६० हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर; १ डिसेंबरपर्यंत...

Video Viral : "मला २०२७ चा वर्ल्ड कप खेळायचा आहे, त्यामुळे शुभमन गिलला खूश ठेवावे लागेल", असं का म्हणाला रोहित शर्मा?

Latest Marathi News Live Update : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची प्रत्यक्ष मतमोजणी दुपारी ३ ते ४ नंतर सुरू होण्याची शक्यता

Sun Transit 2026 in Swati Nakshatra : सूर्य बदलणार चाल! 'या' 5 राशींच्या नशिबात मोठा बदल, पगारवाढ अन् व्यवसायातून होणार तगडा फायदा

Thane Railway Station: कर्मचारी विशेष लोकलचा दरवाजा बंद! ठाणे स्थानकातील संतापजनक प्रकार; प्रवाशांना मनस्ताप

SCROLL FOR NEXT