Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : पहूरच्या घरफोडीतील टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पहूर (ता. जामनेर) येथील बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड, असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. पाच संशयितांना अटक केली असून, त्यात महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

यासंदर्भात पहूर पोलिस ठाण्यात २९ ऑगस्ट २०२१ ला गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना पहूर येथे धाडसी घरफोडी करणारे संशयित जळगाव शहरातील असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.(Pahur house burglary gang jailed Local Crime Branch action Goods worth 17 lakhs seized jalgaon News)

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

यांना केली अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सय्यद सरजील सय्यद हरून (वय २७, रा. मास्टर कॉलनी, जळगाव), अनिल रमेश चौधरी (४०, रा. अयोध्यानगर), सय्यद अराफत सय्यद फारूक (३३, रा. तांबापुरा), सय्यद अमीन ऊर्फ बुलेट सय्यद फारुख (रा. तांबापुरा) आणि भावना जवाहरलाल जैन (लोढा) यांना अटक केली. त्यांच्याकडून १६ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पाचही जणांना पुढील कारवाईसाठी पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या पथकाने केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अनिल जाधव, रवी नरवाडे, हवालदार संजय हिवरकर, विजयसिंह पाटील, राजेश मेढे, सुधाकर अंभोरे, कमलाकर बागूल, अनिल देशमुख, अक्रम शेख, पोलिस नाईक संतोष मायकल, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, विजय पाटील, भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, परेश महाजन, विनोद पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील, महिला पोलिस कर्मचारी अभिलाषा मनोरे, वैशाली सोनवणे, अश्विनी सावकारे आणि रूपाली खरे यांनी ही कारवाई केली, तर सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत कांबळे, उपनिरीक्षक सचिन डोंगरे, हवालदार जयंत चौधरी, पोलिस नाईक विनायक पाटील, किशोर मोरे, सचिन चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी! सोलापुरात आता ‘या’ कार्यालयात दरमहा दोनदा रोजगार मेळावे; मुलाखतीतून थेट जॉबची संधी, वाचा...

Baramati Smart Village: बारामती तालुक्यातील दहा गावांचा ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट

Nagpur Exam Management: नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदी डॉ. अनुप पळसोकर; विस्कळीत परीक्षा व्यवस्थेला रुळावर आणण्याचे मोठे आव्हान

सोलापुरात ओळखीच्या चौघांनी सराफ व्यापाऱ्याला लुबाडले! ८४.५२ लाख रुपये आणि सव्वाकिलो दागिने लंपास; मनीलँडिंग अन्‌ गहाण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये चौघांनी केला अपहार

SCROLL FOR NEXT