Sagar Nagane while pointing out the mistake of Panchayat Samiti.  esakal
जळगाव

Jalgaon News : जिवंत माणसाचे नाव शहीद स्मारकावर! पंचायत समितीचा भोंगळ कारभार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : देशासाठी शहीद झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील वीर जवानांच्या आठवणींना उजाळा मिळावा व त्यांच्यापासून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत राहावी, या उद्देशाने पंचायत समितीच्या माध्यमातून १५ ऑगस्टला पंचायत समितीच्या आवारात शहीद स्मारकाचे अनावरण करण्यात आले होते. (Panchayat Samiti put name of living man on Martyrs Memorial jalgaon news)

या स्मारकावर हुतात्मा झालेल्या वीरांची नावे टाकण्यात आली होती. परंतु या स्मारकातील नावांमध्ये पंचायत समितीकडून मोठी चूक झाली आहे. पंचायत समितीच्या आवारातील शहीद जवानांच्या स्मारकावर सागर बबनराव नागणे या तरुणाचे नाव टाकण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, सागर बबनराव नागणे हा तरुण जिवंत असून, त्याने पंचायत समितीचा भोंगळ कारभार समोर आणला आहे. चाळीसगाव तालुक्यात या नावाचे कुठलीही व्यक्ती शहीद झाली नसल्याचा दावा देखील सागर नागणे या तरुणाने केला आहे. तर ही गंभीर चूक लक्षात येताच पंचायत समितीने स्मारकावरील नाव हटवले असून, खेद व्यक्त केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"तहसील कार्यालयामध्ये शहीद झालेल्या जवानांची नोंद असते. तरी देखील पंचायत समितीने मी जिवंत असताना शहिदांच्या स्मारकावर माझे नाव टाकल्यामुळे मला वाईट वाटले आहे. जर माझ्या नावाचा जवान जर खरच शहीद झाला असेल तर पंचायत समितीने स्पष्ट करावे." - सागर बबनराव नागणे, चाळीसगाव

"चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे गावातील शहीद झालेल्या जवानाचे नाव सागर नागणे या नावाशी मिळते जुळते असल्याने अनावधानाने ही चूक झाली आहे. ही चूक लक्षात येताच पंचायत समितीने चूक सुधारली आहे." - नंदकुमार वाळेकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चाळीसगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman : हिंदू संस्कृतीने भारावून गेलेली रशियन महिला मुलांसह आढळली गोकर्णच्या जंगलात; गुहेत तिच्यासोबत काय घडलं?

Latest Marathi News Updates : 'एक देश एक निवडणूक’साठी संयुक्त संसदीय समितीची ३० जुलैला बैठक? अध्यक्ष पी. पी. चौधरी यांची माहिती

साप्ताहिक राशिभविष्य : (१३ जुलै २०२५ ते १९ जुलै २०२५)

आशियाई अन्‌ विश्‍वकरंडकाच्या तयारीला वेग

पांढरी होणारी दाढी अन् निवृत्ती (एक काल्पनिक कथा)

SCROLL FOR NEXT