esakal
esakal
जळगाव

School Admission : पसंतीच्या शाळांसाठी पालकांची धावपळ; पाल्याच्या भविष्याची चिंता

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : विद्यार्थ्यांची परीक्षा आटोपली असली तरी प्रथमच शाळा प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पालकांची खरी परीक्षा सुरू झाली आहे. पसंतीच्या शाळांसाठी पालकांची धावपळ सुरू असून, ठराविक शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धावाधाव सुरू आहे. (Parents are running to get their children admission in favourite school jalgaon news)

इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पसंती दिली जात असून, त्यातही शाळांना पालकांच्या अधिक प्राधान्य असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील शाळा उन्हाळी सुट्टीनंतर ३० जूनपासून सुरू होणार आहेत. त्यापूर्वी विविध वर्गातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

यात ज्यांना प्रवेश मिळाले नाही, ते आता लाखोंची डोनेशन भरून पसंतीच्या शाळांसाठी धावपळ करताना दिसून येत आहे. दिवसात प्रवेशासाठी पालकांची भटकंती सुरू असून, अनेकांना पसंतीच्या शाळा मिळाल्या नसल्याने त्यांचा हिरमोड होताना दिसत आहे.

सध्या शहरातील बहुतांश खासगी सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश अर्जाची विक्री बंद झाली आहे. राज्य मंडळाच्या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे पालक आपल्या पसंतीच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सीबीएसई व काही प्रमुख राज्य मंडळाच्या खासगी शाळांमध्ये फेब्रुवारीतच प्रवेश प्रक्रिया आटोपली आहे. राज्य मंडळाच्या शाळांमध्ये एप्रिल ते मी महिन्यात प्रवेशाची प्रक्रिया असली तरी अनेक शाळांचे बाहेर प्रवेश बंदच्या पाट्या मार्चमध्येच लागल्या आहेत.

‘सीबीएसई’ला पसंती

व्यावसायिक अभ्यासक्रम व उच्च शिक्षणासाठीचा विचार करून आतापासूनच पाल्यांना स्पर्धात्मक शिक्षणासाठी तयार करण्याच्या दृष्टीने पालक सीबीएसईच्या शाळांना पसंती देत आहेत. राज्य मंडळाच्या शाळेतच त्यांच्या पाल्यांना प्रवेश हवा असतो. परिणामी अमळनेरसह इतर तालुक्यांमध्येही सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होताना दिसत आहे.

‘डोनेशन’मुळे अनेकांचा हिरमोड

सीबीएसई व काही राज्य मंडळाच्या शाळांनी प्रवेशासाठी लाखोचे डोनेशन घेणे सुरू केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे लाखो रुपये डोनेशन देऊन प्रवेश घेण्याची क्षमता नसलेल्या पालकांना त्यांच्या पल्यास पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश घेता आला नाही. अनेकांची डोनेशन देण्याची तयारी असूनही पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश आधीच पूर्ण झाले असल्याने हिरमोड झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT