जळगाव

पुन्हा बेमोसमीचा फटका..पारोळा तालुक्यात वादळी पाऊस व वारा

संजय पाटील

पारोळा ः गेल्या दोन दिवसापासून सायंकाळी चार ते सात च्या सुमारास बेमोसमी (Unseasonal rain) वादळी (Storm) पावसाचे आगमन होत असून पावसासह सुसाट वारा (Wind)येत असल्याने अनेक घरांची (Houses) पत्रे तसेच झाडे कोलमडू लागली आहेत.

(parola district again Storm Wind Unseasonal rain Houses farming Damage)

गेल्या दोन दिवसापासून सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने सायंकाळी चार ते सात च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले त्यावेळी तामसवाडी मंडळातील देवगाव आडगाव सावखेडा करमाळा शिवरे या परिसरात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

बेमोसमी पावसाने गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात थैमान घातले असून वादळी वा-यामुळे शेतातील लिंबूची झाडे कसे रस्त्यावरील दुतर्फा असलेली झाडे कोलमडून पडू लागली आहे तसेच ग्रामीण भागातील वस्तीतील पत्र्यांची घरातील पत्रे उडू लागल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या दोन दिवसापासून या वादळी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे बऱ्याच ठिकाणी विजेच्या तारा पडल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांचे एकच भंबेरी उडाली आहे.

वादळी पावसामुळे जोगलखेडा तालुका पारोळा येथील अनेक लिंबू ची झाडे जमिनीवर पडल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे यावेळी बर्‍याच जणांची शेतात उन्हाळी बाजरी पडून असल्याने काढणीसाठी उधळीत केव्हा मिळेल या विवंचनेत शेतकरी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : ‘पीओके’ भारताचेच, आम्ही ते घेऊ ;अमित शहा

आजचे राशिभविष्य - 17 मे 2024

Latest Marathi News Live Update : महायुतीची शिवाजी पार्कवर तर, इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

SCROLL FOR NEXT