Officials and activists cheering in the procession for the election victory.  esakal
जळगाव

Parola Market Committee Result : पारोळा बाजार समितीवर ‘मविआ’चे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या मार्केट बचाव पॅनलने १५ जागा मिळवून बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेना शिंदे गटाच्या जयकिसान पॅनलला ३ जागा मिळाल्या. (Parola market Committee election Maha vikas aghadi dominates election jalgaon news)

विद्यमान बाजार समिती सभापती अमोल चिमणराव पाटील यांना ३१६ मते मिळाली असून, ते पराभूत झाले आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांना ४०२ मते मिळाली असून, ८६ मताधिक्याने विजयी झाले आहे. सेवा सहकारी मतदारसंघात सर्वसामान्य गटातून माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांना ४७६ मते मिळाली असून, ते विजयी झाले आहेत.

विजयी उमेदवार

सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून नगराज पाटील ४००, पुरुषोत्तम पाटील ३९०, प्रकाश पाटील ३८४, बबन पाटील ४२८, रवींद्र पाटील ४३०, डॉ. सतीश पाटील ४९०, रोहन मोरे ४८५. महिला राखीव मतदारसंघातून : बबीता पाटील ४२३, रेखा सतीश पाटील ४९५. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून डॉ. हर्षल माने ४०२, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून सुरेश वंजारी ४४५. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून मनोराज पाटील ३७१, सुधाकर पाटील ३९३.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून लक्ष्मीबाई रामोशी ३६१. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक निंबा पाटील ३५८. व्यापारी मतदारसंघातून अनिल मालपुरे ५५. जितेंद्र शेवाळकर ५५. हमाल मापाडी मतदारसंघातून राजू मराठे ६७ अशा उमेदवारांनी विजय संपादन केला. दरम्यान, या निवडणुकीत भाजपने तटस्थ भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीला याच्या फायदा झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

मतमोजणी शांततेत

निवडणूक यशस्वितेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी महेश कासार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सिंहले तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पारोळा मंडळ अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, येथील चुरशीच्या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या छत्रीने विजय संपादन केल्याने बाजार समिती ते महामार्ग तसेच कजगाव रस्ता ते माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत सवाद्य मिरवणुकीसह गुलालांची उधळण करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT