Jaywant Patil esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : पारोळा पोलिस ठाण्याचा उपनिरीक्षक लाचेच्या जाळ्यात; अटक न करण्यासाठी घेतले 8 हजार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime : तक्रारदार व त्याचे नातेवाईक यांना अटक करू नये व चार्जशीट लवकर दाखल करावी, यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जयवंत प्रल्हाद पाटील यांना आज सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

धुळे तालुक्यातील अंचाळे येथील ४२ वर्षीय तक्रारदारासह त्यांच्या नातेवाइकांवर पारोळा पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parola police station sub inspector arrested in bribe crime news)

या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या नातेवाइकांना अटक न करण्यासाठी, तसेच न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर पाठविण्यासाठी यातील तक्रारदार यांच्याकडे पोलिस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली.

याअगोदर २० हजार रुपये घेतले व उर्वरित दहा हजार रुपये नंतर घेऊन या, असे सांगितले. त्यानंतर मंगळवारी (ता.१२) उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी पंचासमक्ष दहा हजारांची मागणी करून तडजोडअंती आठ हजार स्वतः स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, अमोल वालझाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलिस कर्मचारी बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर आदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRPF Recruitment Row : एसआरपीएफ पोलिस भरती पेपरात ८५ प्रश्न ‘कॉपी-पेस्ट’; राज्यभर संताप, युद्धपातळीवर चौकशी सुरू

मी राजीनामा देणार नाही, भाजपने कट रचून हरवलंय; ममता बॅनर्जींचे गंभीर आरोप, पराभवानंतर घेतली पत्रकार परिषद

दररोज १५० बालकांवर अत्याचार; समाज अजूनही का गप्प? बालसुरक्षेचा ज्वलंत प्रश्न ऐरणीवर; धक्कादायक आकडेवारी समोर

Business Scheme: बिझनेस सुरू करायचाय? सरकारच्या या 5 योजना बदलतील तुमचं नशीब, मिळू शकतं तब्बल 2 कोटींपर्यंत कर्ज!

Latest Marathi News Live Update : पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहण शेवटच्या टप्प्यात

SCROLL FOR NEXT