Part of protective wall of Faizpur business complex was broken jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : फैजपूरला व्यापारी संकुलाच्या संरक्षकभिंतीचा काही भाग तुटला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरात शनिवारी (ता. २९) आलेल्या वादळी वाऱ्याने घरांची पत्रे उडाली. यात पालिकेच्या मौलाना आझाद व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरील सरंक्षकभिंतीचा काही भाग तुटला. (Part of protective wall of Faizpur business complex was broken jalgaon news)

भिंत तुटल्याची ही दुसरी, तिसरी घटना असल्याने या सरंक्षकभिंतीचे मजबूत बांधकाम करण्यासह छताची गळती बंद करण्यासाठी दुरुस्ती करण्याची मागणी गाळेधारकांकडून पुढे आली आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या आठवडे बाजाराला लागून मौलाना आझाद व्यापारी संकुल फैजपूर पालिकेतर्फे उभारण्यात आले आहे.

यातील दुकाने व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाची आहे. दुमजली असलेल्या या व्यापारी संकुलाचे तळमजल्यावरील सर्वच गाळ्यांमध्ये विविध व्यावसायिक दुकाने आहेत. तर दुसऱ्या मजल्यावरील काही गाळे वापराविना रिकामे आहेत. दरम्यान, या पूर्वी देखील या व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावरील सरंक्षकभिंतीचा काही भाग तुटल्याचे समोर आले होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तसेच भिंत तुटण्याच्या घटना अधूनमधून नेहमीच होत आहेत. आता शनिवारी झालेल्या वादळी पावसाने या संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावरील छतावरील गाळ्यांचा समोरील भागाची व दक्षिणेकडील सरंक्षकभिंत तुटल्या आहेत. पालिकेकडून मात्र या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केले जात आहे.

त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी या प्रकाराची पाहणी करून व गांभीर्याने लक्ष घालून सरंक्षकभिंतीचे नव्याने मजबूत बांधकाम करावे, तसेच पाणी साचून असल्याने गळती लागते. त्याचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, याबाबत बांधकाम अभियंत्यांना प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT