On entering into MoU with MKCL, Vice Chancellor Prof. Dr. V. L. Maheshwari. Neighbor Dr. Vinod Patil, Revati Namjoshi, Prof. Madhulika Sonawane, Ravindra Patil, Santosh Birari  esakal
जळगाव

Jalgaon NMU News : ‘उमवि’त कौशल्य विकासाचे 67 नवीन कोर्सेस; ‘एमकेसीएल’शी सामंजस्य करार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon NMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि एमकेसीएल यांच्यात सामजंस्य करार झाला.

या करारांतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्य विकसनाचे ६७ कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रोजगारासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्यात मोठा हातभार लागणार आहे. (partnership agreement was signed between kbcnmu and MKCL jalgaon news)

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत हा सामजंस्य करार करण्यात आला. या धोरणात विद्यार्थ्यांना क्रेडिट पूर्ण करणे आवश्यक आहे. एमकेसीएलसोबत झालेल्या करारामुळे ६० तासांचे दोन क्रेडिट असलेले आणि १२० तासांचे ४ क्रेडिट असलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार आहे. मात्र, सर्व अभ्यासक्रम कुशल मनुष्यबळ निर्माण करणारे आहेत.

या अभ्यासक्रमांचा समावेश

या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये अंकाउटींग करिअरसाठी ५, बँक ऑफिस करिअरसाठी ५, डिझाईनिंग करिअरसाठी १०, डिजिटल आर्ट करिअरसाठी ६, डिजिटल फ्रीलान्स करिअरसाठी २, फ्रंट ऑफिस करिअरचे ५ आणि आयआर करिअरचा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याशिवाय आयटी हार्डवेअर व नेटवर्क मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करिअरसाठी ३३ प्रमाणपत्र अभ्यासक्रम यात निश्चित केले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कौशल्य विकासासोबतच संभाषण कौशल्य, भाषिक क्षमता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, समुपदेशन करणे हेही होणार आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धा लक्षात घेऊन बाजारपेठेत कौशल्य असलेले मनुष्यबळ निर्माण करणे, हा या सामजंस्य कराराचा प्रमुख उद्देश आहे.

एमकेसीएल अंतर्गत नॉलेज लिट करिअरर्स (KLIC) असे हे कोर्सेस या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असून, विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर स्कील डेव्हलपमेंटच्या लिंकवर विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल, अशी माहिती विशारद स्कील डेव्हलपमेंट केंद्राच्या समन्वयक तथा व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालक प्रा. मधुलिका सोनवणे यांनी दिली.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत झालेल्या सामजंस्य करारप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विशारद केंद्राच्या समन्वयक प्रा. मधुलिका सोनवणे, एमकेसीएलच्या वरिष्ठ महाव्यवस्थापक डॉ. रेवती नामजोशी, वरिष्ठ महाव्यवस्थापक अजित शिंदे, संतोष बिरारी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT