Death news esakal
जळगाव

Jalgaon News : गोरखपूर एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे रेल्वे पेालिसांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ०१०२७ डाऊन गोरखपूर एक्स्प्रेसमधील जनरल बोगीत शनिवारी (ता. १८) रात्री दहाच्या सुमारास ३५ वर्षीय तरुण प्रवासी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. जळगाव रेल्वेस्थानकावर गाडी थांबल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. (Passenger dies in Gorakhpur Express Railway polices appeal for identification Jalgaon News)

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

याबाबत स्टेशन प्रबंधक शरद मोरे यांनी आरपीएफ-जीआरपीएफला माहिती दिली. त्यावरून रेल्वे पोलिस ठाण्याचे सचिनकुमार भावसार व सहकाऱ्यांनी सर्व तयारी निशी तीन क्रमांक फलाट गाठले. गोरखपूर एक्सप्रेस थांबताच बेशुद्धावस्थेतील तरुणाची डॉक्टरांनी तपासणी केली.

डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेहाचा पंचनामा केला व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना केला. शवविच्छेदनात मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. केस काळे, रंगाने सावळा, शरीर बांधा सडपातळ, उंची साडेपाच फूट, अंगात लाल रंगाचे शर्ट, राखाडी फुल पॅन्ट, असे मृत तरुणाचे वर्णन आहे.

त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे कुठलही तिकीट, आधार, पॅन किंवा इतर कुठलही ओळखपत्र नसल्याने त्याची ओळख पटलेली नाही. मृत तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पेालिसांनी केले आहे. स्टेशन प्रबंधक शरद मोरे यांनी दिलेल्या माहितीवरून जळगाव रेल्वे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक सचिनकुमार भावसार तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT