Patharwat community esakal
जळगाव

Jalgaon News : पाथरवट समाज शासनाकडून उपेक्षितच! दगडी कोरीव काम, शिल्पकला जपण्यासाठी हवे प्रोत्साहन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पुरातन काळी लेण्या, शिल्प, दगडी मंदिर देवाच्या मूर्ती, घडविणारा शिवाजी महाराजांच्या काळातले गड-किल्ले बांधणारा समाजाचा इतिहास फार मोठा आहे. बारा बलुतेदारांपैकी हा एक शिल्पकार समाज आहे.

दगडांमध्ये कोरीव काम करून कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या या समाजाला कला टिकविण्यासाठी शासनाकडून कोणताही पाठिंबा मिळत नाही. दगडाला देवपण देणाऱ्या समाजाची दैना सुरू आहे. (Patharwat community neglected by government Encouragement to preserve stone carving sculpture Jalgaon News)

ग्रामीण भागातील महिला आजही पाटा-वरवंटा, जाते, आदी पारंपरिक साधनांचा वापर दैनंदिन जीवनात करतात. काही प्रमाणात या साधनांची जागा तांत्रिक उपकरणांनी घेतली असली तरीपाटा-वरवंटा, नंदी महादेव मूर्ती तयार करणाऱ्या  पाथरवट समाजाच्या या वस्तूला ग्रामीण भागात आजही भरपूर मागणी आहे.

दगडाला विविध प्रकारचा आकार देऊन व गवंडी कामे करुण पाथरवट समाजातील नागरिक आजही पोटाची खळगी भरत आहे. हा समाज इतरांच्या बंगल्याचा पाया मजबूत करतात. त्यांना मात्र पैशाअभावी स्वतःच्या बंगल्याचा पाया कच्चा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दगडाला विविध प्रकारचे आकार देऊन विक्रीसाठी देवस्थान, यात्रा, बाजार सारख्या ठिकाणी गावांमध्ये जाऊया वस्तूची विक्री करतात. मनगटाच्या जोरावर हातोडा, छन्नीच्या मदतीने काळ्याशार दगडावर घाव घालून देव साकारणारा पाथरवट समाज स्वतंत्र भारतातही उपेक्षित जीवन जगत आहे.

उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या या समाजाला कला टिकविण्यासाठी कोणताही पाठिंबा मिळत नसल्याने ही कला जोपासण्याचे आव्हान समाजापुढे उभे आहे. केवळ पाच टक्के लोकांमार्फतच ही कला आज जपली जात आहे. ही कला जिवंत राहावी, त्यासाठी सरकारी पाठिंबा मिळावा, अशी मागणी पाथरवट समाजातून होत आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

रोजगारासाठी धडपड

दगडी पाटा, वरवंटा, नंदीमहादेव डोक्यावर घेऊन गावोगावी फिरणारा भटका पाथरवट समाज आज नोकरीच्या शोधात आहे. गेल्या काही वर्षांपासून समाजाचा पारंपरिक व्यवसाय अडचणीत आल्यामुळे गवंडी काम करून उदरनिर्वाह समाज करत असल्याचे दिसून येत आहे.

समाजातील काही जण शिक्षक व्यवसाय, शिल्पकार, गवंडीकाम, मूर्तिकाम, रंगकाम बांधकाम, क्षेत्रात कर्तव्य बजावत असून, रोजगारासाठी पाथरवट समाजाची धडपड सुरू आहे.

अशा आहे पाथरवट समाज....

महाराष्ट्रात पाथरवट हा समाज असंघटित असून, शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असल्याने समाजात अज्ञान व अंधश्रद्धेचे प्रमाण मोठे आहे. शासनाने पाथरवट समाजाच्या भटक्या, विमुक्त जमातीत समावेश केला असून, समाजासाठी अनेक शासकीय योजना आहेत. मात्र या अद्यापही या योजनांची पुरेशी माहिती समाजाला नाही.

या ठिकाणी आढळतो समाज

खानदेशात जळगाव, साकेगाव, वाघळूद, भामर्डी, फरकांडे, हनुमंतखेडे, वडगाव, नगरदेवळा, आरे, ओझर, पिंपळे खुर्द, धरणगाव, अमळनेर, नाशिक, सिन्नर, कळवण, ताहराबाद, सटाणा, थेगोडा, दरेगाव, दारखेल, शहादा,शिरपूर, नंदुरबार, नवापूर, कसारा, घोटी या ठिकाणी प्रामुख्याने पाथरवट समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

"महाराष्ट्रातील पाथरड समाजाला केंद्र सरकारच्या एका योजनेचा लाभ मिळत नाही. ज्या काही योजना शासनाने समाजासाठी काढलेले आहे त्या समाजाला माहितीअभावी समाजापर्यंत पोहोचत नाही."- उद्धव काळे, सरचिटणीस, अखिल भारतीय पाथरवट महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT