crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मुलीची छेड काढून चॉपरने धमकावले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील नवीन बसस्थानकातून निघालेली बस थेट तालुका पोलीस ठाण्यात पोचली. मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाची तक्रार केल्याने चालकाने बस पोलीस ठाण्यात आणली.

पण त्या तरुणाने चालत्या बसमधून उडी घेत पळ काढल्याची घटना गुरुवारी (ता. २) दुपारी घडली. ()

जळगाव-नांदगाव या बसमध्ये (एम.एच. ८० वाय ५१९३) विद्यार्थी-विद्यार्थिनींसह प्रवाश्यांची गर्दी होती. बस आव्हाणे फाट्याच्या पुढे गेल्यावर एका टवाळखोराने इतर साथीदारांच्या मदतीने बसमधील विद्यार्थिनींची छेड काढली.

विद्यार्थिनींनी वाहकाकडे तक्रार केल्यानंतर वाहक लोटन पाटील यांनी टवाळखोराला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तो त्याच्या मित्रांसोबत बसमध्ये गोंधळ घालून विद्यार्थिनींसमोर चित्र-विचित्र हावभाव करून छेडखानी करत होता.

त्यानंतर विद्यार्थिनींना होणारा त्रास वाढल्याने वाहकांनी चालक तुकाराम रायसिंग यांना बस तालुका पोलीस ठाण्यात नेण्याची सूचना केली. नांद्रा गाव एक किलोमीटरवर असताना चालकाने बस गावात न नेता जळगावकडे फिरवली. पोलिसांच्या भीतीने घाबरलेल्या टवाळखोरांनी बस थांबवण्याची विनंती केली.

चालकाने बस पोलिस ठाण्याकडे नेली. बस थांबत नाही म्हटल्यावर तरुणाने पोलिसांना नाव सांगणाऱ्यांना चॉपर दाखवून धमकी दिली. आव्हाणे फाट्याजवळ तरुणाने चालत्या बसचा दरवाजा उघडून उडी मारली. इथून तो पसार झाला. विद्यार्थी, चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Roopali FDA Action : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली, रूपालीचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन, 'एफडीए'ची मोठी कारवाई

'टोरंट' प्रकल्पाच्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा, ६०० एकर वनक्षेत्र बाधित होणार; जमीन मोजणीची प्रक्रिया पुन्हा सुरु

Latest Marathi News Live Update: ई फेरफार पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय

Syed Mushtaq Ali Trophy : ११ चेंडूंत ५४ धावा! सूर्यकुमार यादवचं वादळी पुनरागमन; मुशीर खानचेही अर्धशतक....

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; चक्रीवादळाची शक्यता, महाराष्ट्रातून थंडी गायब होणार?

SCROLL FOR NEXT