Jalgaon Crime News esakal
जळगाव

जळगाव : मागील भांडण उकरून एकाला बेदम मारहाण

रईस शेख

जळगाव : नशिराबाद येथील हनुमान मंदिराजवळील भवानीनगर येथे मागील भांडणाच्या (Quarrel) कारणावरून एकाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नशिराबाद पोलिस ठाण्यात याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. (person was beaten to death over previous quarrel Jalgaon Crime News)

जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील हनुमान मंदिराजवळील भवानीनगरात शंकर प्रल्हाद जोहरे हा तरुण आपल्या वास्तव्याला आहे. सोमवारी (ता. ६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास शंकर जोहरे याला मागील भांडणाच्या कारणावरून गावातील चंद्रकांत मंगा रंधे, अर्जुन चंद्रकांत रंधे, कमलाकर रामकृष्ण रंधे, पांडुरंग मंगा रंधे आणि गोकूळ पांडुरंग रंधे (सर्व रा. भवानीनगर, जळगाव) यांनी मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या शंकर जोहरे याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. शंकर जोहरे यांनी रात्री नशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चंद्रकांत रंधे, अर्जुन रंधे, कमलाकर रंधे, पांडुरंग रंधे आणि गोकूळ रंधे (सर्व रा. भवानीनगर, जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक अतुल महाजन करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Enterprises Net Loss : अदानी एंटरप्राइजेसला हजारो कोटींचा तोटा; वर्षभरातील सर्वाधिक घसरण

Ratnagiri Bridge Update : बार्जच्या धडकेनंतर म्हाप्रळ-आंबेत पुलाची स्थिती काय? अवजड वाहतूक बंद, मुंबई-पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना 60 किमीचा अतिरिक्त फेरा!

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आता हार्बर मार्गावरही धावणार १५ डब्यांची लोकल, 'या' स्थानकात मोठे बदल; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Nagpur News: खापरखेड्यात धक्कादायक चोरी! बुद्ध विहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पितळेची मूर्ती लंपास

SCROLL FOR NEXT