beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दुचाकी मागण्यावरून चक्क एकाला मारला ग्लास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील प्रभात चौकातील परदेशी सोडा गाडीच्या दुकानाजवळ दुचाकी परत मागितल्याच्या कारणावरून एकाला काचेचा ग्लास मारून गंभीर दुखापत केली. (person was hit by glass due to request for return of two wheeler jalgaon crime news)

दीपक बाबूलाल झंवर (वय ५३, रा. कासमवाडी) हे दूध डेअरीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. सोमवारी (ता. १३) दुपारी चारच्या सुमारास दीपक झंवर प्रभात चौकातील परदेशी सोडा गाडीच्या दुकानाजवळ दुचाकी घेण्यासाठी आले.

त्याठिकाणी महाबळमधील कुंदन चौधरी (पूर्ण नाव माहीत नाही) त्या ठिकाणी आला. दीपक झंवर यांनी कुंदनकडे त्यांची दुचाकी मागितली. याचा राग आल्याने कुंदनने त्याच्या हातात असलेला काचेचा ग्लास दीपकच्या डोक्यावर मारून फेकला.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

दीपकला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्याला तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचार घेतल्यांनतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात संशयित कुंदन चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक सुनील पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT