Jalgaon Crime News : अवैधपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री आणि समाजात धोकादायक ठरू शकतील अशा व्यक्ती असलेल्या जिल्ह्यातील चार जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी (ता. २९) ही माहिती दिली.
जामनेर पोलिस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार योगेश भरत राजपूत (वय २९ रा. जामनेर) हा बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता. (Persons who may be dangerous to society have been send to jail jalgaon crime news)
त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केली. पण कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे जामनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण शिंदे यांनी स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव पाठविला होता.
पहूर पोलिस ठाण्यात वेगवेगळे १६ गुन्हे दाखल असलेला सुपडू बंडू तडवी (वय ४२, रा. चिलगाव, ता. जामनेर) हा देखील गैरमार्गाने हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्यावर निरीक्षक सचिन सानप यांनी देखील स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठविला.
रावेर पोलिस ठाण्यात शेख शाहरुख शेख हसन (वय २६, रा. इमामवाडा, रावेर) याच्यावर वेगवेगळे प्रकारचे दहशत निर्माणचे सहा गुन्हे दाखल आहेत, तर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हेगार योगेश देवीदास तायडे (वय ३३, रा. महेशनगर, भुसावळ) याच्यावर देखील सहा गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांनी त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करावी, असा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केला होता.
जिल्हा पोलिस अधीक्षक राजकुमार यांनी आलेल्या चारही प्रस्तावांचे अवलोकन करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे रवाना केला. जिल्हाधिकारी यांनी स्थानबद्धतेच्या कारवाईच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
चौघांची रवानगी अशी
त्यानुसार गुन्हेगार योगेश भरत राजपूत याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात, सुपडू बंडू तडवी याला अमरावती कारागृहात, शेख शाहरुख शेख हसन याला कोल्हापूर कारागृहात आणि गुन्हेगार योगेश देवीदास तायडे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.