physically disabled Dilip Bhoi sits on floor and writes paper lying on his back jalgaon news
physically disabled Dilip Bhoi sits on floor and writes paper lying on his back jalgaon news esakal
जळगाव

Inspirational News : परिस्थितीवर मात करत दिव्यांग दिलीपची शिक्षणासाठी अशीही जिद्द!

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : अपंगत्व हा शब्द उच्चारला तरी माणसाला धडकी भरते. अपंगत्वामुळे अनेक जण कमालीचे खचतात व त्यांची जीवनाची वाटचाल थंडावते.

परंतु अनेक जण अपंगत्वावर (Disability) मात करून करिअर करून आपले जीवन सार्थकी बनवतात. (physically disabled Dilip Bhoi sits on floor and writes paper lying on his back jalgaon news)

तर काही अपंगत्वच जणू चांगल्या करिअरचे कारण ठरवतात. असाच काहीसा प्रकार पाचोरा येथील दिलीप भोई या विद्यार्थ्यासंदर्भात पाहायला मिळत असून, अपंगत्वावर मात करून शिक्षण घेऊन करिअर करण्याची त्याची धडपड खरोखर कौतुकास्पद आहे.

बाहेरपुरा भागात राहणारा दिलीप भोई हा एम. एम. महाविद्यालयात बारावी कला शाखेची परीक्षा देत आहे. त्याला कमरेपासून खाली कोणतीही संवेदना नाही. बेंच, खुर्ची अथवा टेबलवर त्याला बसता येत नाही. जमिनीवर बसून अक्षरशः पालथा पडून तो पेपर लिहितो. बेंचवर बसता येत नाही म्हणून त्याला वर्गातच खाली बसून पेपर लिहावा लागत आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

त्याच्या या धडपडीत त्याचा भाऊ सुनील त्याचा खरा मित्र व सच्चा साथीदार बनला आहे. सुनील अक्षरशः दिलीपला कडेवर बसवून ने आण करतो. आतापर्यंत त्याने टायपिंग, एमएससीआयटी यातही नाही नैपुण्य मिळवले आहे.

अकरावीपर्यंत शिक्षण घेऊन बारावीची परीक्षा देणाऱ्या दिलीपची शिक्षणासंदर्भातील जिद्द कमालीची आहे. खडतर परिस्थितीत, वेदना सहन करत उच्च शिक्षण घेऊन अपंगत्व दृष्टीआड करता येईल, या जिद्दीने तो प्रेरित झाला असून त्याच्या या जिद्दीचे, धाडसाचे व मेहनतीचे कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT