Death News esakal
जळगाव

Jalgaon News : पिंपळगाव हरेश्वर येथे शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील ४२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

योगेश वाघे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, ते शेतीकाम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. ते मंगळवारी (ता. २०) नेहमीप्रमाणे शेतात गेले. धाकटेगाव शिवारातील गट क्रमांक १२२४ मधील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.(Pimpalgaon Hareshwar Farmers suicide Jalgaon News)

परिसरातील शेतकऱ्यांना त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पाचोरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून हे प्रकरण पिंपळगाव हरेश्वर पोलिसांकडे वर्ग केले.

मृत वाघे यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन मुले, दोन बहिणी, एक मुलगी असा परिवार असून, त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे? याचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT