Bribe Crime esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : लाचखोरीत पोलिस हवालदार अखेर निलंबित

अमळनेरचे हवालदार घनश्याम पवार यांनी रविवार ७ जानेवारीला ठेकेदाराचे डंपर अडवत त्यांच्याकडे पोलिस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून ३० हजारांची लाच मागितली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचे डंपर अडवून ३० हजारांची लाच मागणी करत खासगी पंटरच्या माध्यमातून लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलेले अमळनेर पोलिस ठाण्यातील कर्मचारी घनश्याम अशोक पवार यांचे निलंबनाचा आदेश पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढले. (Police constable final suspended for bribery Jalgaon Crime)

अमळनेरचे हवालदार घनश्याम पवार यांनी रविवार ७ जानेवारीला ठेकेदाराचे डंपर अडवत त्यांच्याकडे पोलिस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून ३० हजारांची लाच मागितली.

तक्रारदाराने याबाबत धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून तक्रार केल्यानंतर धुळे एसीबीने मंगळवार (ता. ९ ) लाच लूचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) सापळा लावत पवार यांनी खाजगी पंटर इम्रान खानकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर सुरवातीला खासगी पंटर व नंतर पवार यांना एसीबीने अटक केली होती.

याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पवार यांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT