Police raids on gambling bases
Police raids on gambling bases esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चाळीसगावला डेअरी भागात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील डेअरी भागामध्ये शुक्रवारी (ता. ५) जुगार अड्यावर झन्नामन्ना पत्ता नावाचा जुगार सुरु असताना पोलिसांनी छापा टाकून रोख १६ हजार दोनशे रुपये व पत्त्याच्या जुगाराची साधने जप्त केली. याप्रकरणी सात जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Police raided gambling den in Chalisgaon Dairy area Jalgaon Crime News)

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ५) रात्री सव्वा अकराच्या सुमारास डेअरी भागात, मॉर्डन डेअरीच्या मागील बाजूस भिंतीच्या आडोशाला काही जण झन्नामन्ना नावाचा पत्ता जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली.

त्यानुसार, उपनिरीक्षक सुहास आव्हाड व त्यांचे सहकारी नितेश पाटील, भूषण पाटील, विनोद भोई, शरद पाटील, नंदकिशोर महाजन, समाधान पाटील, आशुतोष सोनवणे यांच्या पथकाने अचानक छापा टाकला असता, इम्तीयाज हुसेन मिर्झा (वय ४२, रा. रेल्वे स्टेशन मशीद जवळ), बबलू महेबूब शेख (वय ३०, रा.

नगरपालिका मंगल कार्यालयाजवळ, हुडको), अफरोज अल्ताफ शेख गुलाम मोहम्मद (वय ३२, रा. पीर मुसा कादरी नगर), गणेश सोनवणे (वय २४, रा. अभिनव शाळेसमोर), सागर गर्जे (वय ३२, रा. शनी मंदिराजवळ, रिंग रोड), कामरान बेग हुसेन बेग मिर्झा (वय ३९) व विशाल परदेशी (वय २६, दोन्ही रा. पवारवाडी) हे जुगार खेळताना मिळून आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

हा जुगाराचा अड्डा नासीर उर्फ अप्पी हुसेन मिर्झा (रा. पवारवाडी) हा चालवित असल्याचे संशयितांनी सांगितले. त्यावरुन वरील सर्वांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विनोद भोई करीत आहे.

दरम्यान, यापूर्वी २२ एप्रिल रोजी खडकी (ता. चाळीसगांव) येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ११ जणांविरुद्ध कारवाई करुन ७५ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT