Dhule Crime News : दुकानात छापा घालत दीड लाखाचा गुटखा जप्त

Assistant Superintendent of Police S. Hrishikesh Reddy, Sub-Inspector of Police Dattatreya Uje and team
Assistant Superintendent of Police S. Hrishikesh Reddy, Sub-Inspector of Police Dattatreya Uje and teamesakal

Dhule Crime News : शहरातील मच्छीबाजार परिसरातील नंदी रोडवरील दुकानात छापा टाकत पोलिसांनी एक लाख ६० हजारांचा गुटखासाठा जप्त केला, तसेच दोन जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. या प्रकरणी आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. (Gutkha worth one half lakh seized in shop raid Dhule Crime News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Assistant Superintendent of Police S. Hrishikesh Reddy, Sub-Inspector of Police Dattatreya Uje and team
Crime News: गर्लफ्रेंड सोबत फिरणाऱ्या रिक्षाचालकावर मुलीच्या जुन्या मित्राचा चाकू हल्ला

आझादनगर पोलिस ठाणे हद्दीत मच्छीबाजार परिसरात नंदी रोडवर एकजण त्याच्या दुकानात राज्यात प्रतिबंधित गुटखा बाळगून असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांच्यासह पथकाने शनिवारी (ता. ६) सायंकाळी छापा टाकला. यात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक लाख लाख ६० हजारांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड,

अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक रेड्डी, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय उजे, हवालदार कबीर शेख, रमेश उघडे, कर्नल चौरे, अकिला शेख, सोनाली बोरसे, देवेंद्र काकडे, अतुल पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Assistant Superintendent of Police S. Hrishikesh Reddy, Sub-Inspector of Police Dattatreya Uje and team
Crime News: नात्याला काळीमा फासणारी घटना; रागाच्या भरात पत्नीची दोरीने गळा आवळून हत्या; नातेवाइकांचा आरोप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com