Due to the lack of parallel roads along the 'bypass'. esakal
जळगाव

Jalgaon News : पारोळ्यात समांतर रस्त्यांअभावी वाहतुकीची दैना; ‘बायपास’लगत कामे कासवगतीने

धरणगाव चौफुली ते अमळनेर रस्त्यादरम्यान खड्डे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालागत असलेल्या तरसोद ते फागणे अशा महामार्ग बायपासचे काम सुरू आहे. दरम्यान, म्हसवे फाट्यापासून पारोळा बायपासला प्रारंभ होतो. (Potholes between Dharangaon Chaufuli to Amalner road jalgaon news)

यात धरणगाव चौफुली ते अमळनेर रस्त्यालगत समांतर रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून कासवगतीने सुरू असल्यामुळे जळगावकडून पारोळा शहराकडे जाण्यासाठी समांतर रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे या ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची पंचाईत होत आहेत. या समांतर रस्त्याचे काम तत्काळ करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग सहावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण पाहता वाहनांची गर्दी टाळण्यासाठी बायपास मार्ग तयार करण्यात आला. हा बायपास तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला. धरणगाव चौफुली ते बहादरपूर रस्ता दरम्यान तीन अंडरपास आहेत. या लगत समांतर रस्त्याचे काम बहादरपूर रस्त्यावर सुरू आहे. मात्र ते काम कासवगतीने सुरू असल्यामुळे जळगावकडून पारोळा शहरात येणाऱ्या वाहनधारकांची मोठी पंचायत झाली आहे.

दरम्यान, समांतर रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाण्यात खड्डे लक्षात येत नसल्यामुळे चारचाकी वाहनधारकांची तसेच वाहतूक करणाऱ्या ॲपेरिक्षांची मोठ्या प्रमाणात पंचाईत होत आहे. बरीच वाहने साचलेल्या पाण्यात अडकून पडतात.

त्यामुळे संबंधित विभागाने हा प्रश्न तत्काळ मार्गी लावत अमळनेर अंडरपास, वंजारी अंडरपास व बहादरपूर अंडर पाच लगत असलेली दोन्ही बाजूचे समांतर रस्त्यांचे काम पूर्ण करून लवकर सुरू करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

''शहरात येण्यासाठी सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात कच्चा समांतर रस्ता करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल असल्यामुळे वाहन चालवणे जिकरीचे होते. यासाठी महामार्ग प्राधिकरण विभागाने तत्काळ या प्रश्नाला न्याय द्यावा. याबाबत तत्काळ निर्णय न झाल्यास वंचित आघाडी रस्त्यावर उतरेल.''- गौतम पवार तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

''बहादरपूर रस्त्याजवळील अंडरपासलगत समांतर रस्त्याचे काम सुरू आहे. लवकरच अमळनेर रस्त्यालगत असलेल्या डाव्या आणि उजव्या समांतर रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल.''- देवेंद्र पाटील उपाध्यक्ष, ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal TMC Politics: पश्चिम बंगालमधील राजकीय भूकंपानंतर भाजपने दिली पहिली प्रतिक्रिया; नवीन गट सत्तेत जाणार का?

Solapur MLC Election : सोलापूर विधान परिषदेत मोठा गेम! काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद; एका सहीमुळे संपूर्ण निवडणूक फिरली? फत्तेपूरकरांनी उच्च न्यायालयात घेतली धाव

Baba Vanga Prediction: शेवटच्या ७ महिन्यात 'हे' लोक होणार मालामाल! बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत; कोणत्या राशींना होणार लाभ?

Karad Bridge Opening : पुणे -कोल्हापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, कऱ्हाडचा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होण्याची तारीख ठरली

'या' आद्याक्षराने नाव सुरु होणारे लोक असतात स्वतःच्या मर्जीचे मालक ! अत्यंत हुशार आणि श्रीमंत होणारे लोक

SCROLL FOR NEXT