Praveen Gaikwad, Kiran Mane, Pratima Pardeshi, Prof. Dr. Vasudev Mulate etc. esakal
जळगाव

Jalgaon News : मराठा ओबीसी समाज बांधवांनी एकत्र राहणे गरजेचे : प्रवीण गायकवाड

सद्यस्थितीत सामाजिक व राजकीय वातावरण चांगले नाही. मराठा विरुद्ध ओबीसी का झाली, याचा विचार होणे गरजेचे आहे.

उमेश काटे

Jalgaon News : सद्यस्थितीत सामाजिक व राजकीय वातावरण चांगले नाही. मराठा विरुद्ध ओबीसी का झाली, याचा विचार होणे गरजेचे आहे. हे दोन्ही समाज एकत्र काम करीत होते, ते तसेच एकत्रित रहावेत, अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले.

ते १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. (Praveen Gaikwad statement of Maratha OBC community members need to stay together jalgaon news)

संमेलनाध्यक्ष तथा ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे, प्रसिद्ध अभिनेते किरण माने, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष श्याम पाटील, मुख्य संयोजक प्रा. डॉ. लीलाधर पाटील, संयोजक डॉ. मिलिंद बागूल, कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार, निमंत्रक रणजित शिंदे आदींसह संयोजक समितीतील सदस्य उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले की, विद्रोह म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध सत्याचे बंड होय. विद्रोह हा सत्याकडे जाणारा प्रवास आहे. संभाजी ब्रिगेड ही विद्रोही आहे. सत्य सांगण्याचे धाडस प्रत्येकामध्ये असले पाहिजे. संभाजी ब्रिगेड कधीही हिंसक नव्हते, ती कधीही रक्तपात करीत नाही. संस्कृतीचे उत्तर संस्कृतीने दिले जाते, मात्र त्याचवेळी विकृती ठेचावी लागते.

याचाही विचार होणे गरजेचे आहे. श्याम पाटील म्हणाले की, अमळनेर नगरी ही साने गुरुजींची प्रेमाचा संदेश देणारा प्रदेश आहे. लीलाताई पाटील, डॉ. उत्तमराव पाटील यांची भूमी आहे. पुरोगामी विचारांचा हा वारसा असेच पुढे ठेवणार आहे.

प्रा. अशोक पवार म्हणाले की, विद्रोहाची ही भूमिका हजारोंपर्यंत पोहोचण्यासाठी पुरोगामी चळवळींना एकत्र करून हे संमेलन यशस्वी केले आहे. राज्यातील अनेक ठरावांची अंमलबजावणी होण्यासाठी १०० कार्यकर्त्यांची टीम तयार करणार आहोत. डॉ. लीलाधर पाटील यांनी पुणे येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याची पार्श्वभूमी सांगत निषेध केला.

प्रतिमा परदेशी यांनी सांगितले की, अखिल भारतीय साहित्य संमेलनाची शंभरी आम्ही पार करू देणार नाही. जे झाले ते पुरे झाले. विद्रोहाचा हा जागर असाच चालू ठेवणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले. दयाराम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अशोक बिऱ्हाडे यांनी आभार मानले.

संमेलनाचा निधी शाळांना द्या

पुढील अर्थात १९ व्या विद्रोही मराठी संमेलनाची ज्योत पेटवून कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी हसीब नदाफ, एल जे गावित, सुदीप कांबळे यांनी अनेक ठराव मांडले. यात अखिल भारतीय साहित्य संमेलनाला शासनाने दोन कोटीचा निधी बंद करून तो शाळा व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरावा.

तापी निम्न प्रकल्प अर्थात पाडळसरे धरण तातडीने पूर्ण करून त्याचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करावा. गलवाडे परिसरात सुरू असलेल्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाला शासनाने त्वरित निधी द्यावा, विविध बोलीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासह अनेक ठराव यावेळी मंजूर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT