MP Supriya Sule Dr. Satish Patil esakal
जळगाव

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पारोळ्यात बुधवारी शेतकरी मेळावा

सकाळ वृत्तसेवा

Supriya Sule : येथील बाजार समितीचे सभापती तथा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचा अभीष्टचिंतन सोहळा बुधवारी (ता. २९) आयोजित करण्यात आला आहे.

त्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.(presence of MP Supriya Sule farmers meeting will be held in Parola on Wednesday jalgaon news)

या वेळी मुख्य यॉर्डात खासदार शरदचंद्र पवार व्यापारी संकुल, ५० मेट्रिक टन क्षमतेचा इलेक्ट्रिक डिजिटल भुईकाटा व तामसवाडी उपबाजार येथे इलेक्ट्रिक डिजिटल भुईकाटा ५० मेट्रिक क्षमता यासह कृषिरत्न पुरस्कार, व्यापारीरत्न पुरस्कार तसेच एरंडोल- पारोळा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार, जलमंदिर उद्घाटन आदी कार्यक्रम होतील.

या वेळी माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे, माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी आमदार चाळीसगाव राजीव देशमुख, माजी आमदार अमळनेर डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार भुसावळ संतोष चौधरी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच बाजार समिती संचालक उपस्थित राहणार आहेत.

या सर्व कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बाजार समिती उपसभापती सुधाकर पाटील, सचिव दीपक मोरे यांच्यासह संचालक मंडळांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT