Garlic (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : लसणाला आले 'अच्छे दिन...'

लसूण ९० ते १०० रूपयास पाव किलो. म्हणजेच ३६० ते ४०० रुपये किलो दराने उपलब्ध आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : प्रत्येक घराघरात, हॉटेलमध्ये कांदा आणि लसूण असणार नाही, असं अपवादात्मक परिस्थितीत बघायला मिळेल. त्यामुळे कांदा आणि लसणाला कायमच मागणी असते. कांदा किंवा लसूण खाद्यपदार्थात नसले तर अनेकांच्या जिभेला चवच लागत नाही हे वास्तव आहे.

आतापर्यंत सर्वसामान्यांना अधूनमधून कांद्याने आपल्या भाववाढीने रडवलं हे वास्तव आहे. लसूण ९० ते १०० रूपयास पाव किलो. म्हणजेच ३६० ते ४०० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. (price of garlic is good in market price is 400 rupees per kg but common citizens and women are unhappy jalgaon news)

कांद्याने रडविल्यानंतर आता लसूण भाव खात असल्याचे चित्र बाजारात आहे. लसणाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला वर्गात नाराजीचा सूर आहे. प्रत्येक महिन्याला गृहिणींचे बजेट कोणत्या ना कोणत्या कारणाने कोलमडत असते.

कधी गॅस सिलिंडरच्या भावात वाढ होते तर कधी सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू महागतात. अशातच कांदा, टोमॅटोनंतर आता लसूणने देखील सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. किरकोळ बाजारात आवक कमी झाल्याने जास्तीचे पैसे देऊन लसूण खरेदी करावा लागत आहे. लसणाचा भाव तब्बल चारशे रुपये किलोवर जाऊन पोहचला आहे.

एकीकडे पालेभाज्या स्वस्त झाल्या असताना दुसरीकडे लसणाच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातील फोडणीला मात्र ब्रेक लागला आहे. गेल्या डिसेंबरपासून लसणाच्या दरात वाढ होत आहे. पूर्वी चाळीस ते पन्नास रूपये पाव लसणाचा दर होता. आता ८० ते १०० रुपयास पावशेर दराने मिळत आहे.

लसणाचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या ताटातील लसणाची चटणी आणि लसणाचे पदार्थ मेनूमधून कमी झाले आहेत. शहरातील बाजारात गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांची आवक वाढली असून दर देखील घसरले आहेत. त्यात कोथिंबिरीच्या जुडीला पाच रुपये तर मेथी, शेपूचा दर दहा जुडी झाला आहे.

सध्या असलेले भाजीपाल्याचे दर

कोथिंबीर : दहा रुपये जोडी, पालक: दहा रुपये जुडी, शेपू दहा रुपये जुडी, मेथी: दहा रुपये जुडी, काकडी : ३० ते ४० रुपये किलो, टोमॅटो : २० रुपये किलो, वांगे: ४० रुपये किलो, वटाणा शेंगा : ४० रुपये किलो, भेंडी ४० ते ६० रुपये किलो, मिरची: ५० ते ६० रुपये किलो, कांदे : २० रुपये किलो याप्रमाणे कमी-अधिक दरात विक्री होत आहे.

"एवढा महाग झालेला लसूण आम्हाला खायला परवडत नाही. आम्ही महिन्याकाठी एक किलो लसूण खरेदी करीत होतो. मात्र, आता भाव वाढल्यामुळे तीच गरज पाव किलोवर भागवावी लागत आहे. जेवणात लसूण नसल्याने चव येत नाही, त्यामुळे पर्यायच नाही. कितीही भाव वाढले तरी स्वयंपाकात लसूण हा लागतोच."-प्रतिक्षा भावसार, गृहिणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar on Parth Pawar land deal case : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अखेर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

TET Exam 2025: टीईटी संदर्भात शिक्षक परिषदेचे महत्वाचे आवाहन;...तर नुकसानीस उमेदवार जबाबदार राहतील

Pune Protest : 'टीईटी' च्या सक्तीविरोधात शिक्षक संघटनांची वज्रमूठ; २४ नोव्हेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्याचा निर्णय!

Hybrid learning in MBA : एमबीए आणि पीजीडीएममधील हायब्रिड शिक्षण मॉडेल्सचा उदय: संधी आणि आव्हाने

Elon Musk : फडणवीसांनी घडवला इतिहास! Starlink चं इंटरनेट सगळ्यांत पहिलं महाराष्ट्रात.. इलॉन मस्कच्या कंपनीसोबत झाला करार

SCROLL FOR NEXT