Primary Health Center esakal
जळगाव

प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपडे पालटणार; CEOनी घेतला आढावा

केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढावी यासाठी ही संकल्पना मांडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सुशोभीकरण करण्यासोबतच आरोग्य केंद्रांच्या परिसरात आयुर्वेदिक बगीचे साकारण्यात येणार आहेत. जिल्हाभरातील तालुका व वैद्यकीय अधिकारी कार्यालयांनी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या आहेत.

आरोग्य कार्यकारी समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २४) साने गुरुजी सभागृहात पार पडली. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांसह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

दर्जेदार सुविधा देणार

केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढावी व दर्जेदार सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांना पुरविता याव्यात यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सुशोभीकरण करण्याची संकल्पना डॉ. आशिया यांनी मांडली.

लसीकरणाचा आढावा

बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी ‘हर घर दस्तक’ योजनेंतर्गत जिल्हाभरात झालेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. तसेच पुढील आठवडाभरात लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या. शहरी भागात लसीकरणाचा वेग कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कर्मचारी संख्या अपूर्ण पडत असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी ग्रामीण भागातील कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात मदतीसाठी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

‘त्या’ आरोग्य केंद्रांवर कारवाई

‘हर घर दस्तक’ अभियानात ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामगिरी कमी असेल अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कारवाई करण्याच्या सूचनादेखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. काही तालुक्यात समाधानकारक काम होऊ शकत असेल तर अन्य तालुक्यात कामगिरी का कमी होते ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज असल्याच्या सूचना देखील करण्यात आल्या. जिल्ह्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात प्रसूती विनापरिचारिकेची होता कामा नये, यासाठी स्पष्ट निर्देश देखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. अंगणवाडी तपासणी सोबतच कुष्ठरोग तपासणी, बालकांमधील दोष, कमतरता तपासणीचा आढावादेखील यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला.

त्यांच्यावर कारवाई होणार

जे समुदाय वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, किंवा उपकेंद्रावर गैरहजर राहत असतील त्यांच्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कारवाई करावी अन्यथा मला कारवाई करावी लागेल असे स्पष्ट निर्देश देखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या बैठकीत दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election : गोंधळच गोंधळ! नांदेडमध्ये मतदारांना कोंडलं, अंबरनाथला बोगस मतदार आणले, तर कोपरगावात उमेदवारांमध्ये बाचाबाची

मीराच्या डोळ्यांचा रंग का बदलला? इतके दिवस कुठे होती? 'तुला जपणार आहे'च्या अभिनेत्री सांगितलं खरं कारण, म्हणते- सेटवर मला...

Mumbai: ठाणे-सीएसएमटी प्रवास होणार सोपा! सायन उड्डाणपुलाला समांतर दोन पदरी पूल बांधणार; नवीन मार्ग कसा असणार?

Maharashtra Govt Scheme: आनंदी बातमी! या जोडप्यांना महाराष्ट्र सरकारकडून मिळणार 1.5–2.5 लाख रुपये; अर्ज कसा करावा ते जाणून घ्या

Girish Mahajan : 'हरित नाशिक'साठी ५० हजार वृक्षांचा संकल्प; मंत्री गिरीश महाजन यांची 'होमेथॉन'ला भेट

SCROLL FOR NEXT