Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : संकुलाच्या पार्किंगमधील दुकानांचे गौडबंगाल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर पार्किंग जागेत काढलेल्या दुकानावर कारवाई करण्यास महापालिका नगररचना विभाग तयार आहे.

मात्र, महापौरांकडून कारवाई थांबविली जात असल्याचा आरोप आता नगरसेवकांकडूनच करण्यात येत आहे. आता या कारवाईचे गौडबंगाल काय हे उघड होणे गरजेचे आहे, असे नगरसेवकांमध्ये बोलले जात आहे. (Problems of shops in parking lot of complex Municipal officials ready for action Protection of illegal activities by office bearers Jalgaon News)

शहरातील व्यापारी संकुलाबाहेर पार्किंग होत असलेल्या वाहनांवर पोलिसांच्या शहर वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी नाथ प्लाझा व गोलाणी संकुलासमोर पार्किंग केलेली वाहने जप्त केली.

वाहनधारकांना दंड आकारण्यात आला. अनेक वाहनधारकांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध केला. पार्किंगची सुविधाच नाही, संकुलधारकांनी पार्किंग केलेली नाही. त्यामुळे आम्ही वाहने कुठे पार्किंग करावीत, असे प्रश्‍नही पोलिसांना विचारले.

मात्र, त्यांनी कोणतीही तक्रार ऐकून न घेता वाहने जप्त करून वाहनधारकांना बेकायदा वाहन पार्किंगचा दंड आकारला. काहीही कारण नसताना केलेल्या कारवाईमुळे वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

संकुलाचा पार्किंग प्रश्‍न ऐरणीवर

शहर पोलिसांनी दुचाकीधारकांवर कारवाई केल्यामुळे आता संकुलातील पार्किंगचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्यापारी संकुलाच्या बांधकाम नकाशात पार्किंग दाखविली आहे. मात्र, अनेकांनी पार्किंग जागेत दुकाने बांधली आहेत. महापालिकेने शहरातील नेहरू चौक ते घाणेकर चौक मार्गावरील दुकानांचे सर्वेक्षण करून तब्बल १९ व्यापारी संकुलाच्या पार्किंगमधील दुकानांवर कारवाईबाबत प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, पदाधिकारी कारवाईस विरोध करीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

नगरसेवकांचाही आरोप

व्यापारी संकुलातील या पार्किंग दुकानावर होणाऱ्या कारवाईला पदाधिकाऱ्यांनीच विरोध केला असल्याचा आरोप आता नगरसेवकही करीत आहेत. त्याबाबत नगरसेवकांनी सांगितले, की शहरातील व्यापारी संकुलाच्या पार्किंमधील दुकानावर कारवाई करून त्याठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्याबाबत महापौर व उपमहापौर आम्हाला बैठकांसाठी बोलावत होते. प्रत्येक वेळी बैठकीत हाच विषय ते करीत होते.

मात्र, नगररचना विभागाने दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश काढल्यानंतर मात्र ते गप्प झाले आहेत. आता कोणत्याही बैठकीत महापौर व उपमहापौर कारवाईबाबत बोलत नाहीत. ते आता का बोलत नाहीत, याचा खुलासा करावा, अशी मागणीही नगरसेवकांनी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत नेहरू चौक ते घाणेकर चौक भागातील व्यापारी संकुलाच्या पार्किंगमधील दुकानावर कारवाईबाबत महापौर व उपमहापौरांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही नगरसेवकांनी केली आहे.

"महापौर, उपमहापौर व्यापारी संकुलाच्या पार्किंगमधील दुकानावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी बैठका बोलवित होते. आपण स्वत:ही त्या चर्चेत सहभागी होतो. संकुलधारकांना कारवाईची नोटीस दिल्यानंतर मात्र दोघांनीही मौन बाळगले आहे. जळगावकर जनतेला त्यांनी आता उत्तर देण्याची गरज आहे."

-चेतन सनकत, नगरसेवक, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT