Sindhutai Sapkal Sakal
जळगाव

Sindhutai Sapkal : जळगावात गुरूवारी आठवणीतील आई; उलगडणार जीवनप्रवास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : प्रत्येकालाच आपल्या आईविषयी जिव्हाळा असतो, जो शब्दात व्यक्त करता येत नाही. (program aathavanitli aai will be held on 18 may jalgaon news)

अनाथांची ‘माई’मधली ‘आई’ अनुभवण्यासाठी मल्टी मीडिया फिचर्स प्रा. लि. प्रस्तुत ‘आठवणीतील आई’ हा कार्यक्रम येत्या गुरुवारी (ता. १८) सायंकाळी साडेसातला शहरातील महाबळ परिसरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे होणार आहे. कार्यक्रमाचे प्रायोजकत्व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने स्वीकारले आहे.

‘नकुशी’ म्हणजे पद्मश्री स्व. सिंधुताई सपकाळ... माईंच्या जीवनाची सुरवात जरी नकुशीने झाली असली, तरी त्यांनी एका अग्नीदिव्याप्रमाणे संघर्ष केला. केवळ स्वत:चेच नव्हे, तर हजारो अनाथांच्या ‘जीवनाचं सोनं’ केले.

अशा या अनाथांच्या माईंना ४ जानेवारी २०२२ला परमेश्‍वराने त्यांच्याजवळ स्थान दिले. असे असले तरी त्यांच्या कार्याचा ठसा ममता सपकाळ व सहकारी अविरत पुढे नेत आहेत. ‘आठवणीतील आई’ या कार्यक्रमात सिंधुताईंचा जीवनप्रवास सांगण्यासाठी, तसेच त्यांच्या पश्‍चात संस्थेचे कार्य, मुलांचा सांभाळ कशा पद्धतीने होत आहे, या विषयावर प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे सौ. सपकाळ यांची भावोत्कट मुलाखत घेणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी

सौ. ममता म्हणजे सिंधुताईंची लेक. सिंधुताईंनी जेव्हा हजारो अनाथांच्या आयुष्यामध्ये सौख्याचे रंग भरण्यासाठी आपले आयुष्य वेचायचे ठरविले, तेव्हा त्यांच्या पोटच्या गोळ्याचं म्हणजेच ममताताईचं काय करायचं? हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्‍न होता.

तेव्हा केवळ ममताताईंच्या समजुतदारपणामुळे व आसामान्य त्यागशील स्वभावामुळे त्या हजारो अनाथांच्या जीवनातील कल्पवृक्षाचे काम करु शकल्या. ‘माई’ या आपल्या जन्मदात्या असल्या, तरी जेवढा त्यांच्यावर व त्यांच्या प्रेमावर माझा अधिकार आहे तेवढाच, किंबहुना त्याहून थोडा जास्तच अधिकार भारतातल्या शेकडो मुला-मुलींचा आहे. हे सत्य मी कोवळ्या वयातच स्विकारले होते. असं ममताताई म्हणतात. त्या या कसोटीत खऱ्या उतरल्याने आज महाराष्ट्रातील कित्येक मुले सुखी झाली आहेत.

सन्मानिकेसाठी संपर्क

सिंधुताईंच्या पश्‍चात आजमितीला २१० हून अधिक अनाथ मुला-मुलींचा सांभाळ, १५० हून अधिक भाकड गाईंची सेवा माईंची लेक ममताताईंसह एकूण ६४ सेवाभावी सहकारी पूर्ण निष्ठेने करीत असून, माईंचे कार्य आजही सुरु आहे. कार्यक्रमाच्या सन्मानिकेसाठी शहरातील आकाशवाणी केंद्रासमोरील मल्टी मीडिया फिचर्स प्रा. लि. येथे संपर्क साधावा. प्रवेश सर्वांसाठी खुला व नि:शुल्क आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT