जळगाव

जळगाव : दिव्यांगांच्या स्वयंरोजगारासाठी सुविधा उपलब्ध करून देणार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दिव्यांगांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभाग, सामाजिक संस्था यांच्या सहभागाने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी (ता. ३) येथे केले.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने इंडियन रेडक्रॉस सोसायटी व जिल्हा समाजकल्याण विभाग (जि. प.) व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने उल्लेखनीय व विशेष कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या फिजियोथेरेपी केंद्रात फिजियोथेरेपी देणाऱ्या २० तज्ज्ञांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दिव्यांग २० बालकांना फिजियोथेरेपीचे साहित्य वाटप करण्यात आले.

रेडक्रॉस भवनात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पकंज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलावळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बाळासाहेब मोहन, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, डॉ. अपर्णा मकासरे डॉ. अनिल सिरसाळे, समाजकल्याण विभागाचे भरत चौधरी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे नोडल अधिकारी जी. टी. महाजन, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार, डॉ. उल्हास पाटील फिजियोथेरेपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, स्वयंदीप दिव्यांग महिला कापड उद्योगांच्या संचालिका मिनाक्षी निकम, उद्योजक वर्धमान धाडीवाल, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी उपस्थित होते. रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांनी सूत्रसंचालन केले. दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सुवर्णा चव्हाण, शोएब शेख, रेडक्रॉसचे कर्मचारी, विशेष दिव्यांग शाळांचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.

दिव्यांगांना व्यापक व सुयोग्य मदत

गनी मेमन म्हणाले, की दिव्यांगत्व हा शाप न मानता त्यास आव्हान म्हणून बघितल्यास जीवन आनंदात जगणे सोपे जाईल. त्यांचे जगणे सुलभ होण्याकरीता भविष्यात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व इंडियन रेडक्रॉस सोसायटी माध्यमातून दिव्यांगांना व्यापक व सुयोग्य प्रमाणात मदत केली जाईल. निकम यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याबाबत विशेष लक्ष देऊन रोजगार उपलब्ध करुन देवू असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT