crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी योगेश दिनकर कोळी (रा. डांगरी, ता. अमळनेर) याला जळगाव जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात ९ साक्षीदारांची साक्ष सरकार पक्षातर्फे तपासण्यात आली.(Punishment of labor for abusing minor girl jalgaon crime news)

अल्पवयीन मुलगी ६ डिसेंबर २०२१ ला रात्री नऊला नैसर्गिक विधी करण्यासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी योगेशने तिच्या मागून येऊन तिचे तोंड दाबत तिला एका जुन्या घरात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ‘जर तू ओरडली, तर तुला जीवे ठार मारेन' अशी धमकी दिली होती.

त्यानंतर रात्री साडेबाराला पीडित मुलगी घरी गेल्यावर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. धरणगाव पोलीस ठाण्यात ७ डिसेंबर २०२१ ला संशयित आरोपी योगेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. पीडित मुलगी, पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे जिल्हा शासकीय अभियोक्ता सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT