Commissioner Dr. Vidya Gaikwad and officials with the new vehicle purchased in the Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : दिवाळीच्या मुहूर्तावर महापालिकेच्या ताफ्यात नवीन 5 वाहनांची खरेदी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : महापालिकेतर्फे गेल्या अनेक वर्षात अधिकाऱ्यांसाठी नवीन गाड्यांची खरेदी झाली नव्हती. मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन पाच वाहने खरेदी करण्यात आले आहेत.

मनपाच्या प्रशासकीय वाहन ताफ्यात पूर्वी अधिकाऱ्यांसाठी ३१ वाहने होती, मात्र वाहनांची मुदत संपल्यामुळे त्या बंद करण्यात आल्या होत्या. (Purchase of 5 new vehicles in municipal corporation on occasion of Diwali jalgaon news)

आता फक्त बारा गाड्या शिल्लक होत्या. त्यातीलही पाच गाड्यांची मुदत डिसेंबर २०२३ मध्ये संपत आहे. महापालिकेत आता शासनातर्फे सर्वच अधिकारी नियुक्त झाले आहेत.

तसेच महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांनाही वाहने नव्हती. तसेच जुन्या वाहनांचा देखभाल दुरुस्ती खर्च जास्त होता. त्यामुळे मनपाने पाच नवीन वाहने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केलेली आहेत.

बऱ्याच वर्षांनंतर मनपाचे नवीन प्रशासकीय वाहन खरेदी केलेली आहेत. मारुती सुझुकी कंपनीच्या या गाड्या असून त्यात आयुक्तांसाठी ग्रँड व्हिटारा ही नवीन गाडी असेल, इतर चार गाड्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.

महापालिका फंडातून ही वाहने खरेदी करण्यात आली आहे.नवीन वाहन खरेदी या लेखाशिर्षकार्तंगत वाहने घेण्यात आली आहेत.

महापालिकेच्या आवारात ही वाहने आज आणण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या हस्ते वाहनांची पूजा करण्यात आली. यावेळी अधिकारी तसेच वाहन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action: दहशतवादी कृत्यांना आर्थिक पुरवठा अन्..., बदलापूर गावात ईडीचा छापा; नेमकं काय घडलं?

Bank UPI Service: खातेधारकांनो लक्ष द्या! डिसेंबर महिन्यात UPI सेवा पूर्णपणे बंद राहणार; कोणत्या बँकेची अन् कधी? वाचा...

Udyogini Scheme: महिलांसाठी सरकारची खास योजना! गॅरंटीशिवाय दिलं जातंय 3 लाखांचे कर्ज; जाणून घ्या अर्ज कसा करायचा

Mumbai: आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर महाराष्ट्रात होणार! रोजगार नव्याने फुलणार; फडणवीसांनी 'ती' जागाच सांगितली

CIDCO House: सिडकोचं घर घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार! दररचनेत बदल करण्याचे निर्देश, राज्य सरकारचं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT