Cotton Crop esakal
जळगाव

Jalgaon News : कापसाचा दर्जा घसरतोय, वजनातही होतेय घट; 80 टक्के कापूस घरात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ८० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. कापूस आल्यानंतर त्याची विक्री १५ ते २० दिवसांत करणे अपेक्षित असते, अन्यथा कापसाचे वजन कमी होते अन्‌ दर्जाही खालावतो. मागील वर्षी अतिवृष्टीने कापसाचे पीक वाया गेले होते. यामुळे कापूसटंचाई निर्माण झाली होती. कापूस कोठेच मिळत नव्हता. यामुळे मागील वर्षी कापसाला एप्रिल व मे महिन्यात १३ ते १४ हजारांचा दर मिळाला होता. यंदाही तसाच दर मिळेल, अशी आशा ठेवणे हितावह असले, तरी दर्जा खालावल्यानंतर जादा दर कसा मिळेल, असे कापूस अभ्यासकांना वाटते. (Quality of cotton declining weight is decreasing 80 percent cotton at home Latest Jalgaon News)

कापूस निर्यात बंद आहे. कापूस निर्यात सुरू झाली, की कापसाला मागणी वाढून १३ ते १४ हजारांचा दर कापसाला मिळेल, अशा अफवांचे पीक सोशल मीडियाच्या माध्यमातून आले आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या दराचे वाट पाहावी. मात्र, दर चांगले मिळेल नाही, तर आता असलेला दरही मिळणार नाही. यामुळे काही प्रमाणात कापूस विक्रीस आणणे हितावह ठरेल, असा सल्ला कापूस अभ्यासकांनी दिला आहे.

यंदाचा हंगाम दोन वेळच्या वेचणीत संपुष्टात आला आहे. अनेकांनी कापूस उपटून पाटाच्या पाण्यावर येणारी पिकांसाठी पेरण्या सुरू केल्या आहेत. घरात अधिक काळ कापूस ठेवल्यास दर्जा अन्‌ वजनातील घट तोट्यात घालणारी असते, याचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा. सध्या कापसाला दोन दर आहेत. त्यात आठ ते साडेआठ हजार व साडेआठ ते नऊ हजारांचा दर आहे.

First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

तीस हजार गाठींचा कापूस

आतापर्यंत बाजारात दोन लाख गाठींचा कापूस बाजारात येणे अपेक्षित होते. मात्र, केवळ ३० हजार गाठींचा कापूस बाजारात आला आहे.

"मागील वर्षी फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान कापसाला १३ ते १४ हजारांचा दर मिळाला होता. यंदाही तसाच दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सध्याचा दर बऱ्यापैकी आहे. मात्र, दोन पैसे जास्त मिळतील. जेव्हा दर वाढतील, तेव्हा कापूस विकू, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे." -किशोर चौधरी, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT