Devotees flock to Mahadev Temple for darshan esakal
जळगाव

Jalgaon News : कपिलेश्वर यात्रोत सव्वा लाख भाविकांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

कळमसरे (जि. जळगाव) : अमळनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेले खानदेशातील पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून ओळख लाभलेल्या नीम (ता. अमळनेर) जवळील कपिलेश्वर महादेव मंदिराच्या (Temple) यात्रोत्सवाला आजपासून सुरवात झाली. (quarter of million devotees in Kapileshwar Yatra jalgaon news)

सुमारे पंधरा दिवस हा यात्रोत्सव साजरा होत आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यात्रेच्या पहिल्याच दिवशी जवळपास सव्वा लाख भाविक महादेवाच्या पायरीवर नतमस्तक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. रात्री उशीरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची रिघ सुरूच होती.

आमदार अनिल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ यांनीही दर्शन घेत ट्रस्टींची भेट घेतली. गर्दीचा उच्चांक पाहता, मंदिरापासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. मारवड पोलिस ठाण्याचे जयेश खलाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

तालुका व तालुक्याबाहेरील येणाऱ्या भाविकांसाठी अमळनेर आगारातून थेट मंदिरापर्यंत बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन घेतल्यानंतर यात्रा पाहण्यासाठी भाविक नौकेने पलिकडे जाताना येताना दिसून आले. यावेळी अनेकांनी नौका विहाराचा मनमुराद आंनद लुटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Mob kills young Hindu: संतापजनक! बांगलादेशात जमावाने आणखी एका हिंदू तरुणाचा बेदम मारहाण करून घेतला जीव

Christmas: चक्कर येऊन पडला सांताक्लॉज..., 'आप'च्या तीन बड्या नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल; चेष्टा करणं पडलं महागात

Crime: गुन्ह्यांचं शतक करायचं होतं, पण ५०० रुपयांच्या नोटेनं खेळ बिघडवला, तरुणाला तुरुंगवास घडवला, काय घडलं?

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Latest Marathi News Live Update : एमजीएमच्या मैदानावर रंगणार नऊ दिवस सामने

SCROLL FOR NEXT