fraud crime  esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : घड्याळांनंतर सौंदर्य प्रसाधनांवर छापेमारी; 2 दुकानांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : ख्यातनाम बहुराष्ट्रीय कंपनी हिंदुस्थान लिव्हरच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधने तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या फुले मार्केटमधील दोन दुकानांमध्ये तपासणी करण्यात आली.

त्याठिकाणी ९९ हजार ६९८ रुपयांचे बनावट उत्पादने आढळून आली असून तीन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Raid on cosmetic products shop case filed against 2 shops jalgaon fraud crime news )

दोन दिवसांपूर्वीच बनावट घडाळ्यांच्या बनावट उत्पादनांवर कारवाई करण्यात आलेली असताना सौंदर्य प्रसाधनांवर कारवाई झाल्याने शहरातील फुले मार्केट नकली माल विक्रीचा बाजार झालाय की, काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

फुले मार्केटमध्ये हिंदुस्थान लिव्हर कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधने असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.६) सायंकाळी ६ वाजता साईश्रद्धा नॉवेल्टी, जय अंबे कॉस्मेटिक या दुकानांमध्ये तपासणी केली.

त्यावेळी तेथे बनावट सौंदर्य प्रसाधनांवर हिंदुस्थान लिव्हर कंपनीचे नाव वापरून त्याची विक्री केली जात होती. कंपनीचे हुबेहुब उत्पादने तयार करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे आढळून आले. ९९ हजार ६९८ रुपयांचे बनावट उत्पादने असल्याचे तेथे आढळून आले.

याप्रकरणी कंपनी अधिकारी नयनतारा डेव्हिड डेमी (रा. बंगळूर, कर्नाटक) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संतोष अरुण देवरे (३६, रा. कांचननगर), जगदीश गुलाबराव नागदेव (३२, रा. भुसावळ), विशाल कमलकुमार ढिंगवाणी (२४, रा. कंवरनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT