Illegal sand stock deposited in collector office  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : खेडी, बांभोरी, सावखेड्यात अवैध वाळूसाठ्यावर छापे; 250 ब्रास साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जिल्ह्यात वाळूउपसा बंद आहे. यामुळे वाळूमाफियांची गैरसोय झाली आहे. तरीही काही वाळूमाफियांनी नदीकाठच्या काटेरी झाडाझुडपांत अवैध वाळूसाठे करून लपविले आहेत. (Raids on illegal sand deposits in village Bambhori Savkheda jalgaon crime news)

हे साठे जप्त करण्याचा सपाटा महसूल विभागाने सुरू केला आहे. शनिवारी (ता. ८) व रविवारी (ता. ९) रात्री सावखेडा, बांभोरी, खेडी येथे अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्यासह महसूल पथकाने साठे जप्त केले. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

खेडी परिसरात शनिवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास अपर जिल्हाधिकारी महाजन यांनी नदीकाठच्या परिसरात वाळूसाठा शोधमोहीम राबविली. त्यात ५० ते ६० ब्रास वाळू आढळून आली. रविवारी दुपारनंतर सावखेडा परिसरात अशीच शोधमोहीम राबविली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात १४० ब्रास वाळू आढळली. बांभोरी येथेही मोहीम राबवून ५०-६० ब्रास वाळू जप्त केली. अपर जिल्हाधिकारी महाजन यांच्यासोबत तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार राहुल वाघ, धरणगावचे तहसीलदार, महसूलची टीम सोबत होती.

जिल्हाधिकारी कार्यालयात साठा जमा

जिल्हा प्रशासनाच्या प्रशासकीय इमारतीत अवैध जप्त केलेला वाळूसाठा जमा करून ठेवला आहे. त्याठिकाणी शंभरापेक्षा अधिक डंपर, ट्रॅक्टर, ट्रकही आहेत. यामुळे प्रशासकीय इमारतीत आता जागा कमी आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामागील जेलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत आता जप्त केलेला वाळूसाठा जमा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabharat War: कसं घडलं महाभारातातील युद्ध? AI LIVE रिपोर्टींग VIRAL, ५१४२ वर्षे मागे जाल, साक्षात कृष्ण-अर्जुन सर्वांना पाहाल

शतकीय खेळीनंतरही यशस्वी जैस्वाल संघाबाहेर, तर आयुष्य म्हात्रेला संधी; रणजी सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर...

Swabhimani Shetkari Sanghatana: 'कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवली'; सोन्यासारख्या ऊसला कवडीमोल भाव; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Nagpur News: सडकी सुपारी विक्रेत्यांच्या सिंडीकेटवर वार; गुन्हेशाखेची कारवाई, चार गोदामांवर छापा, ९० लाखांची सुपारी जप्त

Location Tracker : मोबाईलमधलं 'हे' App ट्रॅक करतंंय तुमचं लोकेशन? जाणून घ्या एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT