liquor kilns  esakal
जळगाव

गावठी दारू हातभट्टीवर छापा; सव्वा लाखाची दारू जागेवरच नष्ट

या कारवाईत जागेवर कच्चे रसायन व इतर साहित्य नष्ट करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील टाकळी प्र. चा., ओझर, पातोंडा, वाघडू या चार गावांमध्ये एकाच वेळी गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावर शहर पोलिसांनी शनिवारी (ता. २८) सकाळी सहा ते सातच्या सुमारास छापा टाकून सव्वालाखाची हातभट्टीची दारू जागेवरच नष्ट केली.

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर (परिक्षेत्र, नाशिक), जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशान्वये व अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक उपविभाग कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर ढिकले, पोलिस उपनिरीक्षक आव्हाड, सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, पोलिस कर्मचारी पंकज पाटील, श्री. मालचे, भूषण पाटील, शैलेश पाटील, महेंद्र पाटील, दीपक पाटील, पंढरीनाथ पवार, अमित बाविस्कर, विनोद भोई, सुभाष घोडेस्वार, नीलेश पाटील, सुनील निकम यांनी वेगवेगळी तीन पथके तयार करून ही कारवाई केली. या कारवाईत सहा गावठी दारू पाडण्याच्या हातभट्या उद्ध्वस्त केल्या. त्यात ६ ठिकाणाहून ३ हजार ९६५ लिटर गावठी दारू (अंदाजे किंमत १ लाख १८ हजार रुपये) जप्त करण्यात आली. तसेच जागेवर कच्चे रसायन व इतर साहित्य नष्ट करण्यात आले.

या वेळी गंगुबाई आनंदा माळी (रा. ओझर, ता. चाळीसगाव), ज्ञानेश्वर पांडुरंग गायकवाड (रा. पातोंडा, ता. चाळीसगाव), जितेंद्र पांडुरंग गायकवाड (रा. पातोंडा, ता. चाळीसगाव), राधेश्याम गुलाब गायकवाड (रा. पातोंडा, ता. चाळीसगाव), धनराज भिका गायकवाड (रा. ओझर, ता. चाळीसगाव), जंगलू बन्सी भिल्ल (रा.वाघडू, ता. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT