Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

No Hawkers Zone : रेल्वेस्थानक परिसर आता ‘नो हॉकर्स झोन’; महासभेत प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

No Hawkers Zone : रेल्वेस्थानक परिसरात हॉकर्सच्या वादामुळे आता हा परिसर ‘नो हॉकर्स’ झोन करण्यात येणार आहे, तर मेहरुण तलाव परिसरातील दहा गल्ल्यांतील रस्त्यांना ‘लेक सिटी’ परिसर, असे नामकरण करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला आहे.

महापालिकेची महासभा येत्या ७ जुलैला सकाळी अकराला होणार आहे. महापौर जयश्री महाजन अध्यक्षस्थानी असतील. महासभेत एकूण ६६ विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यात शासकीय व अशासकीय प्रस्ताव आहेत. (railway station area is now no hawkers zone jalgaon news)

‘अमृत २.०’साठी सल्लागार नियुक्ती

महासभेत महापालिकेच्या ‘अमृत २.०’ योजनेच्या आराखड्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार आहे. ठाण्याच्या फोर्ट्रिस इन्फ्रॉकॉन लिमिटेड व छत्रपती संभाजीनगरच्या यश इनोव्हेटिव्ह सोल्यूशन यांच्या संयुक्त नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

सभागृहाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटी

महापालिकेच्या सभागृहाचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यासाठी पाच कोटी खर्चास मंजुरी घेण्यात येणार आहे.

हॉकर्सला बंदीचा प्रस्ताव

रेल्वेस्थानक परिसरात हॉकर्समुळे वाद होत आहे. त्यामुळे आता हा परिसर संपूर्णपणे ‘नो हॉकर्स’ झोन करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिस चौकी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंतच्या भागात आता हॉकर्सला बंदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

मेहरुण तलाव रस्ता ‘लेक सिटी’

मेहरुण तलाव ही ओळख अत्यंत जुनी आहे. आता हा परिसर विस्तीर्ण झाला आहे. याच तलावामुळे या भागाचे वैभव निर्माण झाले आहे. मात्र, आता त्याचे नाव ‘लेक सिटी’, असे होणार आहे.

शिरसोली रोडवरून मेहरुण तलावाकडे जाणाऱ्या गल्ल्यांना आता ‘मेहरूण तलाव रस्ता’ न म्हणता ‘लेक सिटी गल्ली क्रमांक एक, दोन ’, असे दहा गल्ल्यांचे नामकरण करण्यात येणार आहे. याबाबत प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. याशिवाय शहरातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी, तसेच काही खुल्या जागा संस्थांना देण्याबाबतचे प्रस्तावही सभेत ठेवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT