rajya kabaddi spardha Pune in womens category and Nandurbar in mens category in semifinals jalgaon news esakal
जळगाव

Rajya kabaddi Spardha : महिलांमध्‍ये पुणे, तर पुरुष गटातून नंदुरबार उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगावात सुरू असलेल्‍या राज्‍यस्‍तरीय कबड्डी (kabaddi) स्‍पर्धेत महिला गटातून पुणे, तर पुरुष गटातून नंदुरबार संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्‍पर्धेतील उपांत्‍य व अंतिम सामने मंगळवारी (ता. १४) खेळविले जाणार आहेत. त्यानंतर स्‍पर्धेचा समारोप होईल. (rajya kabaddi spardha Pune in womens category and Nandurbar in mens category in semifinals jalgaon news)

जळगाव येथील सागर पार्क मैदानावरील मॅटवर २१ व्या छत्रपती शिवाजी महाराज करंडक स्‍पर्धा सुरू आहे. सोमवारी (ता. १३) सामन्‍यांमध्‍ये महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याने नाशिकचा ५३-१९ असा सहज पराभव केला.

मध्यांतराला २३-१३ अशी आघाडी घेणाऱ्या पुण्याच्या संघाने उत्तरार्धात अधिक जोशपूर्ण खेळ करीत गुणांचे अर्धशतक पार केले. आम्रपाली गलांडे, सायली केरीपाळे, पूजा शेलार यांचा चतुरस्त्र खेळ या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. नाशिकच्या पूर्णिमा शिंदे, पूजा कुमावत चमकल्या.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

नंदुरबारचा कोल्‍हापूरवर विजय

पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात नंदुरबारच्या संघाने कोल्हापूरच्या संघाला ४६-२५ असे नमवून आगेकूच केली. विश्रांतीला २९-१२ अशी आघाडी घेणाऱ्या नंदुरबारच्या संघाने उत्तरार्धात सावध खेळ करीत हा विजय साकारला. ओंकार गाडे, दादासाहेब आव्हाड, अभिजित गायकवाड, ऋषिकेश बनकर यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

कोल्हापूरकडून ओमकार पाटील, निखिल बर्गे उत्तम खेळले. या सामन्‍यांपूर्वी झालेल्या सामन्यातून पुरुष गटातून मुंबई शहर, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, नंदुरबार, नांदेडच्या संघांनी बाद फेरी गाठली, तर पुणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, नंदुरबार, पालघरच्या महिला संघांनी बाद फेरीत प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेला 'सर्वोच्च' दणका! कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

Latest Marathi News Live Update : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ग्रामस्थांचा मूक मोर्चा

SCROLL FOR NEXT