Rajya Kabaddi Spardha Pune Women Mumbai Team Final Winner in Mens Group jalgaon news
Rajya Kabaddi Spardha Pune Women Mumbai Team Final Winner in Mens Group jalgaon news esakal
जळगाव

Rajya Kabaddi Spardha : पुणे महिला, पुरुष गटात मुंबई संघ अंतिम विजेता!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत (Rajya Kabaddi Spardha) महिला गटात मुंबई उपनगर आणि पुणे जिल्हा यांच्यातील अंतिम सामन्यात पुणे जिल्ह्याने मुंबई उपनगरवर ३७-२८ गुणांच्या फरकाने मात करून पुणे जिल्हा अंतिम विजेता ठरला. (Rajya Kabaddi Spardha Women from Pune and Mens from Mumbai Team in Final Winners jalgaon news)

पुरुष गटात मुंबई शहर जिल्ह्याने अहमदनगर जिल्ह्यावर २८-२५ गुणांच्या फरकाने मात करून मुंबई शहर जिल्हा अंतिम विजेता ठरला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे), महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय (जळगाव) यांच्यातर्फे सागर पार्क मैदानावर या स्पर्धा झाल्या. मंगळवारी (ता. १४) स्पर्धेचा समारोप झाला.

असे झाले सामने

जळगाव येथील सागर पार्क मैदानावरील मॅटवर झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात पुण्याने मुंबई शहरचा ४१-२६ असा पराभव केला. पूर्वार्धात अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या सामन्यात पुण्याकडे १७-१६ अशी आघाडी होती.

उत्तरार्धात मात्र पुण्याच्या सायली केरीपाळे, आम्रपाली गलांडे यांच्या झंजावाती चढाया व पूजा शेलार, अंकिता जगताप यांचा भक्कम बचावामुळे हा सामना एकतर्फी झाला. मुंबईकडून ऋणाली भुवड, पूजा यादव, साधना विश्वकर्मा यांनी पूर्वार्धात कडवी लढत दिली. उत्तरार्धात मात्र ते कमी पडले.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

दुसरा उपांत्य सामना एकतर्फी झाला. त्यात मुंबई उपनगरने पालघरचा ५६-३१ असा सहज पाडाव केला. विश्रांतीलाच २ लोण देत ३१-१२ अशी आघाडी घेणाऱ्या उपनगरने उत्तरार्धातही तोच जोश कायम राखत हा विजय सोपा केला. हरजितकौर संधू, याशिका पुजारी यांच्या झंजावाती चढाया आणि करीना कामतेकर हिच्या भक्कम बचावामुळे हा विजय सहज शक्य झाला. पालघरची पूजा पाटील चमकली.

पुरुष गटातील सामने

पुरुषांच्या उपांत्य सामन्यात मुंबई शहरने मुंबई उपनगरचा ३९-२० असा सहज पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अहमदनगरने नंदुरबारला ३२-३१ असे चकवित अंतिम फेरीत धडक दिली. मध्यांतराला १२-१८ अशा पिछाडीवरून नगरने ही विजयाची किमया साधली.

शिवम पठारे, प्रफुल्ल झावरे यांच्या धारदार चढाया, संकेत खळाते, अजित पवार यांचे उत्तम क्षेत्ररक्षणाला या विजयाचे श्रेय जाते. नंदुरबारकडून ऋषिकेश बनकर, रवींद्र कुमावत, श्रेयश उंबरदंड यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली, पण संघाच्या विजयास ती कमी पडली.

उपांत्यपूर्व सामना

सोमवारी (ता. १३) रात्री उशीरा झालेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई शहरने ५-५ चढायांच्या डावात नांदेडचे आव्हान ३५-३२ (७-४) असे संपविले. मध्यांतराला १९-०९ अशी आघाडी घेणाऱ्या मुंबईला पूर्ण डावात नांदेडने २८-२८ असे बरोबरीत रोखले होते.

प्रणय राणे, सुशांत साईल यांच्या आक्रमक चढाया, त्यांना हर्ष लाड, संकेत सावंत यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे मुंबईने हा विजय साकारला. अक्षय सूर्यवंशी, सुनील दुबिले, मनोज बोंद्रे यांचा उत्तरार्धातील उत्तम खेळ ५-५ चढायात कमी पडला.

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा प्रतिकार ३६-२१ असा मोडून काढला. रिशांक देवाडीगा, आकाश रुडले, संकेत मोरे या विजयाचे शिल्पकार ठरले. विशाल ताटे, बालाजी जाधव यांचा खेळ पुण्याचा पराभव टाळण्यास कमी पडला.

पुरुषांच्या शेवटच्या सामन्यात अहमदनगरने ठाण्याला ४२-२१ असे सहज नमवित उपांत्य फेरी गाठली. शिवम पठारे, देविदास जगताप, राहुल धनावडे अहमदनगरकडून, तर शुभम शिर्के, अभिजित घारे ठाण्याकडून उत्कृष्ट खेळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT