A magnificent idol of Sri Rama.
A magnificent idol of Sri Rama.  esakal
जळगाव

Ram Navami 2023 : श्रीराम जन्मोत्सवाचा जिल्ह्यात उत्साह; शेंदुर्णीत शतकोत्तर सोहळा..!

सकाळ वृत्तसेवा

शेंदुर्णी (जि. जळगाव) : खानदेशातील विख्यात संतकवी आणि भगवत् भक्त (वै.) भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व (वै.) गोविंदराव पारळकर यांच्या अथक प्रयत्नाने ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असलेला शतकोत्तर श्रीराम जन्मोत्सव (Ram Navami 2023) सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. (ram navami 2023 Centenary Shri Ram Janmotsav celebration is being celebrated in shendurni jalgaon news)

सकाळी प्रभुंच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा (ता.२२) ते चैत्र शुद्ध अष्टमी (ता. २९) पर्यंत दररोज रात्री साडेआठला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रा. स्मिता आजेगावकर (पुणे) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार झाले. या कीर्तनाला भाविकांची प्रचंड प्रमाणावर उपस्थिती होती. अष्टमीचे कीर्तन सायंकाळी झाले. समाप्तीनंतर महिला भाविकांच्या डोळ्यात अश्रू होते.

या सोहळ्यात गुरुवारी (ता. ३०) चैत्र शुद्ध नवमीला (ता.३०) सकाळी दहा वाजता संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादी वारस शांताराम महाराज भगत यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे रसाळ कीर्तन होणार असून, यासाठी वारकरी संप्रदाय भजनी मंडळ शेंदुर्णी यांची साथसंगत लाभणार आहे. दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव सोहळा व प्रसाद वितरण होईल. रात्री आठला ‘श्रीं’ची शहरातून सवाद्य भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

यंदाचे श्रीराम जन्मोत्सवाचे हे १०२ वे वर्ष आहे. या उत्सवात महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार यांनी आपली सेवा प्रभु रामरायाच्या चरणी केली आहे. या उत्सवात वारकरी संप्रदाय भजनी मंडळ, हरिपाठ महिला भजनी मंडळ शेंदुर्णी तसेच शेंदुर्णीकर ग्रामस्थ यांचा सहभाग आणि सहकार्य लाभत आहे. तरी सर्व भाविकांनी या श्रीराम जन्मोत्सवात सहभागी व्हावे, तसेच आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी यांनी केले आहे.

‘इस्कॉन’तर्फे आज महोत्सव

पाचोरा : येथील ‘इस्कॉन’च्यावतीने गुरुवारी (ता. ३०) निमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच ते रात्री नऊ दरम्यान महोत्सवांतर्गत हरिनाम, संकीर्तन, गौरआरती, पार्थसारथी प्रभू यांच्या अमृतवाणीतून राम कथेचे निरूपण, पुष्पाभिषेक, नैवेद्य भोग, महाआरती व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. वरखेडी रोडवरील जगन्नाथ मंदिरात हे कार्यक्रम होणार असून, भाविकांनी उपस्थिती देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन ‘इस्कॉन’च्यावतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT