Ramdas Athawale  esakal
जळगाव

Ramdas Athawale News : जास्तीत जास्त विरोधकांनी एकत्र येत मोदींना विरोध करावा : आठवले

सकाळ वृत्तसेवा

Ramdas Athawale News : देशातील २६ विरोधी पक्षांची बैठक मुंबईत होत आहे, त्यांचे मुंबईत स्वागत आहे, त्यांनी समुद्र पाहावा आणि आपला पंतप्रधानपदाचा उमेदवारही ठरवावा, तो त्यांचा अधिकार आहे.

विरोधकांना एकत्र येऊन विरोध करण्याचा अधिकार आहे, त्यांनी जास्तीत जास्त विरोधी पक्षांना एकत्र करून आपली आघाडी वाढवावी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करावा. (ramdas athawale statement on narendra modi jalgaon news)

मात्र २०२४ मध्ये पुन्हा मोदीच सत्तेवर येणार आहेत, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व आरपीआय गटाचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केले. जळगाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

श्री. आठवले गुरुवारी (ता. ३१) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की आमचा रिपब्लिकन पक्षही नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक पंतप्रधान मोदी इंदू मिलच्या जागेत उभे करीत आहेत. मुंबईत बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही उभारला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

देवेंद्र फडणवीस यांना अधिकार देऊन मंत्रिपदात अजित पवार यांचे पंख कापले जात असल्याच्या चर्चेबाबत ते म्हणाले, की फडणवीस एकटे काही सर्वच अधिकार घेणार नाहीत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने अजित पवार काम करतील.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका व महापालिका निवडणूका महायुतीच्या माध्यमातूनच लढविल्या जातील. आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार करावा यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्याशी बोलणार आहोत.

तसेच या विस्तारित मंत्रिमंडळात आमच्या पक्षालाही एक मंत्रिपद द्यावे, अशीही मागणी करणार आहोत. तसेच जिल्हा नियोजन मंडळ व इतर शासकीय समित्यांवर पक्षाचा प्रतिनिधी घेण्यात यावा, अशी आपली मागणी राहणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT