girl harrasment  esakal
जळगाव

Jalgaon Crime : आजारी महिलेस दुधातून झोपेच्या गोळ्या देत अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विवाहितेला दूधात झोपेच्या गोळ्या देऊन अत्याचार केला. वारंवार घडणाऱ्या प्रकारातून जाणीव झाल्याने विवाहितेने त्या गोष्टीस नकार दिला. त्यानंतर तिला मुलगा व पतीचा खून करण्याची धमकी देण्यात आली. (rape of married woman by giving sleeping pills in milk jalgaon crime news)

जळगाव शहरात भाड्याचे घर घेण्यासाठी विवाहितेला जयदीप पाटील याने मदत केली होती. तेव्हापासून मैत्री झाल्याने त्याचे त्या विवाहितेच्या घरी ये-जा वाढली. पीडितेच्या पतीची बदली झाल्याने ते नोकरीच्या ठिकाणी गेले.

एकदा पीडिता आजारी पडली. तेव्हा जयदीप पाटील याने गरम दूधात झोपेच्या गोळ्या मिसळून पीडितेवर अत्याचार केला. घडला प्रकार कुणालाही सांगू नये, म्हणून तो ब्लॅकमेल करीत होता. ४ जानेवारी २०२२ ते ३ एप्रिल २०२३ दरम्यान त्याने विवाहितेवर अत्याचार केला. विवाहितेने नकार दिल्यावर जयदीप याने मुलगा व पतीचा खून करण्याची धमकी दिली.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

जयदीप याने विवाहितेला मारहाण केली. याबाबत विवाहितेने मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात जयदीप पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले तपास करीत आहेत.

दरम्यान, अत्याचार केल्याने पीडिता सावध होऊन त्याच्यापासून लांब राहू लागली. त्यामुळे जयदीप पाटील याने तिच्या पतीलाच फोन करून आमचे संबंध होते. आता ती दुसऱ्यासोबत जुळली आहे, असे खोटे सांगितले. त्यावरून पीडितेच्या पतीने पोलिस चौकशी केल्यावर घडलेल्या प्रकाराचा उलगडा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

Pune News : आयफोन विमा दावा नाकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय; ८९ हजार परत करण्याचे आदेश

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

SCROLL FOR NEXT