Banana esakal
जळगाव

Rate Hike : केळी भावात 10 दिवसात प्रतिक्विंटल 450 रुपयांची वाढ

सकाळ वृत्तसेवा

रावेर (जि. जळगाव) : वाढलेल्या थंडीमुळे केळी कापणीचे कमी झालेले प्रमाण आणि याउलट उत्तर भारतात केळीची वाढलेली मागणी यामुळे मागील १० दिवसापासून केळीच्या भावात टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. गेल्या १० दिवसात केळीचे भाव क्विंटलमागे सुमारे ४५० रुपयांनी वाढले असून आगामी काळात महिनाभर तरी केळीचे भाव असेच स्थिर राहतील अशी स्थिती आहे. (rate Increase in banana by Rs 450 per quintal in 10 days jalgaon news)

१८ जानेवारीला केळीचे भाव १३१० रुपये क्विंटल असे होते. त्यानंतर जवळपास दररोजच केळी भावात २५ रुपये ते ६५ रुपये अशी वाढ होत गेलेली दिसून येते. २७ जानेवारीला १६३५ रुपये क्विंटल, २८ जानेवारीला १६८५ रुपये आणि उद्या (ता.२९) १७५५ रुपये क्विंटल असे दर बाजार समितीने जाहीर केले आहेत.

असे असले तरी केळीची कापणी अत्यल्प असल्याने केळीला बाजार समितीने जाहीर केलेल्या दरापेक्षा देखील ३०० ते १ हजार रुपये जास्त देऊन खरेदी केली जात आहे. उत्तर भारतात केळीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे सांगण्यात येते. मागील महिनाभरापासून वाढलेल्या थंडीमुळे जिल्ह्यात केळीची कापणी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

तसेच २०२२ च्या फेब्रुवारी - मार्च महिन्यात केळीची लागवड कमी झाल्याने देखील या काळात कापणी योग्य केळी फारशी उपलब्ध नाही. ही स्थिती आणखी किमान महिनाभर कायम राहील अशी माहिती बाजार भाव समितीचे अध्यक्ष रामदास पाटील (निंबोल) यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT