In Ayodhyanagar, preparations are underway to make Ravana by the Panchvati Chowk Mitra Mandal.
In Ayodhyanagar, preparations are underway to make Ravana by the Panchvati Chowk Mitra Mandal. esakal
जळगाव

Dussehra 2023 : अयोध्या नगर, मेहरूण तलावावर आज रावण दहन

सकाळ वृत्तसेवा

Dussehra 2023 : विजयादशमीनिमित्त आज (ता.२४) शहरात दोन ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. अयोध्यानगरातील पंचवटी चौक सांस्कृतिक मित्र मंडळ, भाजप महानगरतर्फे (ता.२४) १५ फुटी रावण दहन होणार आहे.

त्यासाठी रावणाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.(Ravana Dahan program will held at two places in city jalgaon news)

सायंकाळी सहाला हनुमान मंदिर, अयोध्या नगर येथे रावण दहन होईल. मूर्तिकार दिलीप रोटे, प्रतिकृतीसाठी मंडळाचे पदाधिकारी जीवन पाटील, खुशाल खडके, गौरव पाटील, भावेश सुपे यांनी रावण उभारणीचे कामकाज केले आहे.

अयोध्या नगर परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. विजयादशमीनिमित्ताने एल.के.फाउंडेशनतर्फे मेहरुण तलाव येथे रावण दहन कार्यक्रम सायंकाळी सहाला होणार आहे.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष ललित कोल्हे यांनी दिली. मेहरुण तलाव येथे ५१ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT