Raymond controversy Meeting scheduled was canceled jalgaon news esakal
जळगाव

Raymond Case : रेमंडमधील वादाबाबत आयोजित बैठक रद्द; मंत्र्यांच्या भूमिकेबाबत संशय

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रेमंडमधील (Raymond) कामगार संघटना व व्यवस्थापनाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी कामगार मंत्र्यांच्या दालनात आयोजित बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. (Raymond controversy Meeting scheduled was canceled jalgaon news)

कंपनीने कामगारांना कामावर हजर होण्याबाबत अल्टिमेटम दिल्यानंतर बहुतांश कामगार कामावर हजर झाले. मात्र, कामगार हितासाठी आयोजित बैठक ऐनवेळी रद्द केल्याने यात राजकारण झाल्याचे बोलले जात आहे.

गेल्या आठवड्यापासून रेमंडमधील कामगारांचे वेतन करारावरून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यातून कामगार संघटनांमधील वादही समोर आला. त्यामुळे कंपनी परिसरात तणाव निर्माण होऊन कलम १४४ लागू करण्यात आले. माजी महापौर तथा कामगार नेता ललित कोल्हेंवर गुन्हाही दाखल झाला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

हा विषय थेट विधिमंडळात गाजला. विधान परिषद सदस्य एकनाथ खडसेंनी लक्षवेधी मांडत मुद्दा उपस्थित केला. त्यावर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी शुक्रवारी २ वाजता त्यांच्या दालनात बैठक घेण्याची सूचना केली, त्यानुसार बैठकीचा अजेंडा निश्चित झाला. बैठकीस पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, खडसे यांच्यासह कामगार उत्कर्ष सभा,

खानदेश कामगार उत्कर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. कामगार प्रतिनिधी मुंबईत हजर झाले होते. पण, ऐनवेळी ही नियोजित बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे कामगार हिताच्या निर्णयाचे क़ाय? यासह बैठक रद्द करण्यामागे काही राजकारण तर झाले नाही ना? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maritime Law Explained: खलाशांना कोणते संविधान लागू असते? सागरी मार्गांचे नियमन करणारे कायदे कोणते? TAX घेण्याचा नियम काय?

"झेंडा सिनेमातील 'त्या' भूमिकेमुळे पोलिसांची सिक्युरिटी घ्यावी लागली" सुनील तावडेंनी सांगितला प्रसंग

Kolhapur Fraud Case : कोल्हापुरातील मित्रांनी मिळून मित्राला गंडवल, लग्न लावून देतो म्हणून हजारो रुपये उकळले; चित्रपटाला लाजवेल अशी आहे कथा

Vastu Shastra : घराबाहेर 'या' ४ प्रकारची झाडं म्हणजे संकटाला निमंत्रण; कुटुंबात सतत वाद, पैशाची अडचण, हाती आलेल्या यशाला मुकता

Latest Marathi News Live Update : नागपुरात जोडप्याकडून रेल्वे पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT