An episode from the play 'Mazar'. esakal
जळगाव

Rajya Natya Spardha 2023 : फाळणीच्या भळभळत्या जखमेचे वास्तव...‘मजार’

सकाळ वृत्तसेवा

Rajya Natya Spardha 2023 : मानवनिर्मित देशांचे तुकडे करून निर्माण झालेल्या सीमा, सैनिकांचे कर्तव्य आणि फाळणीतून सर्वसामान्यांची झालेली होरपळ ही आजही आपल्या देशाची भळभळती जखम आहे.

फाळणीच्या दुःखाची, दैन्याची आजही भळभळत असलेल्या जखमेवर भाष्य करणारे नाट्य महाराष्ट्र सरकारच्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे चौथे पुष्प गुंफताना मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) यांनी इरफान मुजावर लिखित व वैभव मावळे दिग्दर्शित मजार या नाट्याचा प्रयोग जळगावमधील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सादर केला.(reality of festering wound of Partition...Mazar rajya natya spardha 2023 jalgaon news)

राजस्थानातील भारत-पाकिस्तान सीमेवर रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यातील एका मुस्लीम सैनिकाला वाळवंटात हालचाल दिसते...तेवढ्यात एक तरुणी भारतीय हद्दीत प्रवेश करते. तिला सैनिक थांबवतो, तिची चौकशी करतो. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘रिपोर्टिंग' करणार तोच, ती तरुणी सैनिकाच्या हातापाया पडते, ‘रिपोर्टिंग करू नका’ अशी विनंती करते.

दिवस उगवण्याच्या आत मी परत पाक हद्दीत जाईल असे वचन देते. सैनिक व भारतीय सीमेत आलेली तरुणी आपल्या कुटुंबाविषयी एकमेकांची विचारपूस करतात. तरुणीला कळते, हा मुस्लीम असून भारतीय सैन्यात आहे. सैनिकाचे आजोबा हे मोठे जमीनदार असून फाळणीपूर्वी पाकिस्तानमधील एका गावात राहत असतात.

त्याच्याकडे एक हिंदू कुटुंब राहत असते. याच गावात एक मजार असते, त्या मजारीवर सैनिकाच्या आजोबांची खूप श्रद्धा असते. फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये धर्मावरून दंगली होतात. गावातील मुस्लीम लोक जमीनदाराच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवतात व हिंदू कुटुंबाला आमच्या ताब्यात द्या, असे सांगतात अथवा गाव सोडून जाण्यास सांगतात ; पण आजोबा जमावाला न जुमानता हिंदू कुटुंबाचे रक्षण करतात.

जमाव त्यांचे घर पेटवून देतात. आजोबांचे कुटुंब जीव वाचविण्यासाठी भारतात येते. पण हिंदू कुटुंब तिथेच राहते. सैनिक तरुणीला तिच्या गावाविषयी विचारतो. तरुणी जेव्हा तिच्या गावाचं नाव सांगते तेव्हा सैनिकाला त्याच्या आजोबांची शेवटची इच्छा आठवते.

तरुणी त्या सैनिकाला त्याच्या आजोबांच्या इच्छेविषयी विचारते. आजोबांची इच्छा पाकिस्तानमधील त्याच्या गावातील मजारीवर चादर चढवण्याची असल्याचे सांगतो. तरुणी त्याला विचारते, ‘तुम्ही ती चादर चढवली का?' सैनिक तिला उत्तर देतो, ‘ती चादर केव्हाच चढवली'.

या दरम्यान, दोघांमधील संभाषणात जातीयवाद आणि त्यातून निर्माण होणारी फाळणी आणि द्वेष, सीमेवर दोन्ही देशांच्या सुरक्षेवर होणारा अगणित खर्च यावर भाष्य करत असताना, सीमेवर कार्यरत सैनिकांचे खडतर जीवन, त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या आणि सामान्य माणसाची हतबलता यावर भाष्य करत नाट्य प्रवाही होत जाते.

मात्र अखेरीस नाट्याचे रहस्य उलगडते, तेव्हा ती तरुणी अतिरेकी असून, त्या छावणीतील कागदपत्र मिळवण्यासाठी आल्याचा खुलासा होता. ती माजीदला मारून छावणीतील कागदपत्र घेऊन पाकिस्तानकडे निघते अशा आशयाचे हे नाटक होते.

लेखकाने दिलेल्या सशक्त संहितेतील शब्दांना योग्य न्याय देत दिग्दर्शक वैभव मावळे हे मजार नाट्य प्रवाही व प्रभावी करण्यात यशस्वी ठरतात. मात्र काही ठिकाणी नाट्यातील खटकणारे संदर्भ नाट्यास बाधक ठरतात. कलावंतांकडून दिग्दर्शकाने करून घेतलेली मेहनत जाणवत असताना, त्याला कलावंतांच्या नवखेपणाची झालरही जाणवत होती.

नाट्य एकदा रंगमंचावर आले की, ते कलावंतांचे होऊन जाते. त्यामुळे दिग्दर्शकाने घेतलेल्या मेहनतीच्या पुढे जाऊन कलावंतांनी सादरीकरण करणे अपेक्षित असते, याठिकाणी हे नाट्य काहीसे अपुरे ठरते.

अभिनयाचा विचार करता गजानन चौधरी (माजीद) वाचिक दोष वगळता, तर ज्योती पाटील (गीता) नाट्य प्रवाही करण्यात यशस्वी ठरतात. त्यांना साथ दिली ती तेजसा सावळे (माजीदची आई), सोनल शिरतुरे (माजीदची बायको), लोकेश मोरे (माजीदचे आजोबा), प्रथम तायडे (गीताचे वडील), प्रशांत चौधरी (लल्लन), गौरी देशमुख (लल्लनची बायको), गायत्री सोनवणे (स्त्री), यश मराठे, पवन खोंडे, संघपाल डोंगरे, शिव वाघ, प्रशिक सपकाळे, राज सोनवणे (व्यक्ती) यांनी.

तांत्रिक अंगांचा विचार करता दिनेश माळी यांचे नेपथ्य, प्रथम तायडे यांची प्रकाशयोजना नाट्यास पूरक अशी, तर अंशरा शेख (पार्श्वसंगीत), लोकेश मोरे (रंगभूषा), यश मराठे (वेशभूषा), सिद्धांत सोनवणे, उमेश चव्हाण (रंगमंच सहाय्य) नाट्यास प्रभावी करणारे होते. नाट्य स्पर्धेच्या चौथ्या दिवशी एक चांगल्या रंगमंचीय आविष्काराचा अनुभव दिल्याबद्दल मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या कलावंत व तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन!

बुधवारचे (ता. २९) नाटक

‘विठ्ठला’

लेखक : विजय तेंडूलकर

दिग्दर्शक : रमेश भोळे

इंदाई फाउंडेशन, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT